ETV Bharat / state

सांगलीत साडेबारा हजारांची चिल्लर घेऊन आला लोकसभेचा उमेदवार, अधिकारी हैराण - candidate

सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी एका उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी लागणारी अनामत रक्कम ही चक्क 'चिल्लर'च्या स्वरुपात 'अदा' केली.

अभिजित बिचुकले सांगली अपक्ष उमेदवार
author img

By

Published : Apr 2, 2019, 9:39 AM IST

Updated : Apr 3, 2019, 12:53 PM IST

सांगली - लोकसभेची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी एका उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी लागणारी अनामत रक्कम ही चक्क 'चिल्लर'च्या स्वरुपात 'अदा' केली. अभिजित बिचुकले असे या उमेदवाराचे नाव असून त्यांनी साडेबारा हजार रुपयांची चिल्लर निवडणूक विभागाकडे अनामत रक्कम म्हणून जमा केली. बिचकुळे यांनी दिलेली चिल्लर रक्कम मोजताना निवडणूक प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक झाली.

अभिजित बिचुकले सांगली अपक्ष उमेदवार

सांगली लोकसभा निवडणुकीसाठी अभिजित बिचुकले यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आहे. त्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची स्टाईल थोडीशी हटके ठरली. कारण निवडणूक अर्ज भरताना अनामत रक्कम भरण्यासाठी लागणारे पैसे त्यांनी चिल्लर स्वरूपात आणले होते. पिशव्या भरून चिल्लर घेऊन बिचकुले यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. तब्बल २५ हजार रुपयांची चिल्लर घेऊन ते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बिचुकले पोहोचले होते. त्यांच्या जातीच्या दाखल्यामुळे त्यांना साडेबारा हजार रुपये भरावे लागतील, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा बिचकुले यांनी दोन रुपये, पाच रुपये आणि दहा रुपये असे नाणे स्वरूपातील चिल्लर रक्कम अधिकाऱयांना दिली. ती रक्कम त्यांनी मोजून घेण्यास सांगितले. तेव्हा मात्र, ही चिल्लर भरून घेताना प्रशासनाची चांगलीच दमछाक उडाली.

नाणी जमा करण्याचा आपल्याला छंद असल्यामुळे ही रक्कम जमा झाली होती. ती आज या निवडणुकीचा अर्ज भरताना वापरली. असे बिचकुले यांनी सांगितले. मूळचे सातारचे असलेले बिचुकले हे सांगलीचे जावई असून देवराष्ट्र हे त्यांच्या पत्नीचा गाव आहे. त्यामुळे मी जावई म्हणून सांगलीच्या लोकसभा मैदानात उतरलो आहे. २००९ मध्ये सातारचे खासदार उदयनराजे यांच्याविरोधात निवडणुकीसाठी आपल्या पत्नीला आपण मैदानात उतरवलो होते. ती सांगलीची कन्या म्हणून ही अभिमानाची गोष्ट होती. आता सांगली लोकसभेसाठी आपण स्वतः निवडणूक लढवत आहे. सांगलीच्या विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढत असल्याचे बिचुकले यांनी यावेळी सांगितले.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

avb

FEED SEND - FILE NAME -
R_MH_1_SNG_01_APR_2019_COIN_UMEDWARI_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_3_SNG_01_APR_2019_COIN_UMEDWARI_SARFARAJ_SANADI

स्लग - चिल्लर घेऊन दाखल केली एका उमेदवाराने अपक्ष उमेदवारी ..

अँकर - सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी चिल्लर घेऊन एका उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला आहे.अभिजित बीचुकले असे या उमेदवाराचे नाव असून साडेबारा हजार रुपयांची चिल्लर निवडणूक विभागाकडे अर्जा सोबत अनामत रक्कम म्हणून जमा केली.त्यामुळे चिल्लर मोजताना निवडणूक प्रशासनाची दमछाक झाली.

Body:व्ही वो - सांगली लोकसभा निवडणुकीसाठी आज अभिजित बिचुकले यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची स्टाईल थोडीशी हटके ठरली आहे.कारण निवडणूक अर्ज भरताना अनामत रक्कम भरण्यासाठी लागणारे पैसे त्यांनी चिल्लर स्वरूपात आणले होते.पिशव्या भरून चिल्लर घेऊन बिचकुले यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला.२५ हजार रुपयांची चिल्लर घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बिचुकले पोहोचले होते. या ठिकाणी जातीच्या दाखल्या मुळे त्यांना साडेबारा हजार रुपये भरावे लागतील असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आणि बिचुकेल यांनी अधिकाऱ्यांना समोर चिल्लर ठेवत,साडे बारा हजार रुपये दिले.मात्र ही चिल्लर भरून घेताना प्रशासनाची चांगलीच दमछाक उडाली दोन
रुपये,पाच रुपये आणि दहा रुपये असे नाणे स्वरूपात ही रक्कम होती. नाणी जमा करण्याचा आपल्याला छंद असल्यामुळे ही रक्कम जमा झाली होती आणि ती कुठेतरी वापरावी म्हणून या निवडणुकीच्या अर्ज भरताना पण ती वापरली. असे मत यावेळी बीचुकले यांनी व्यक्त केलं.मूळचे सातारचे असलेले बिचुकले हे सांगलीचे जावई असून देवराष्ट्र हे त्यांच्या पत्नीचा गाव आहे. त्यामुळे जावई म्हणून सांगलीच्या लोकसभा मैदानात उतरलो आहोत . सातारचे खासदार उदयनराजे यांच्याविरोधात 2009 मध्ये आपल्या पत्नीला आपण मैदानात उतरलो होतं सांगलीची कन्या म्हणून ही अभिमानाची गोष्ट होती.आणि आता सांगली लोकसभेसाठी आपण स्वतः निवडणूक लढवत आहे.सांगलीच्या विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढत असल्याचे बिचुकले यांनी यावेळी सांगितले.

बाईट - अभिजीत बिचुकले - अपक्ष उमेदवार, सांगली लोकसभा.

Conclusion:
Last Updated : Apr 3, 2019, 12:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.