सांगली - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांची आज पुण्यतिथी साजरी होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या आबांचे आकस्मिक जाणे, मनाला चटका देणारे होते, आजही आबांच्या आठवणींनी अनेक जण गहिवरून जाताता. त्यांच्या या स्मृतीदिना निमित्ताने आबांनी निधनाच्या चार दिवस आधी राज्याच्या काळजी विषय लिहलेली एक चिट्टी समोर आली आहे..
आबांची 'ती' शेवटची चिट्टी -
सोशल मीडियावर आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या फेसबुक पेजवरून व्हायरल झालेली आहे. निधनाच्या चार दिवस आधी आर आर आबांना बोलता येत नव्हते, तरीही आबांना राज्याची काळजी होती आणि त्यातूनच हात सुजलेले असताना देखील आर आर आबांनी ते जाणून घेण्यासाठी "राज्यात काय चाललंय"अशा प्रकारचे वाक्य "त्या" चिठ्ठीवर लिहिलं होते. शेवटच्या क्षणापर्यंत आबांना राज्यातल्या जनतेच्या विषयी असणारी काळजी चिठ्ठीत लिहलेल्या त्या चार वाक्यातून दिसते आहे. आबांची शेवटची आठवण असणारी चिट्टी आता समोर आली आहे. आबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आबांची कन्या स्मिता पाटील आणि त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून ही आबांच्या हस्तलिखित असणारी चिट्टी पोस्ट करत आबांना एक प्रकारे श्रद्धांजली वाहिली आहे.
आबा...सर्वसामान्यांचे नेतृत्व -
16 फेब्रुवारी 2015ला आर आर आबांचे मुंबई मध्ये निधन झाले होते. सतरा तारखेला त्यांच्यावर तासगाव तालुक्यातल्या अंजनी या गावी अंत्यसंस्कार पार पडले होते. ही घटना महाराष्ट्राला धक्का देणारे होते. राष्ट्रवादी काँग्रेसची तर खूप मोठी हानी बाबांच्या जीण्याणे झालेली आहे. आजही ती पोकळी असल्याची भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कडून वारंवार व्यक्त करण्यात येते. सर्वसामान्यांचे एक नेतृत्व, याशिवाय यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांच्या राजकीय विचारांचे वारसदार म्हणून ही त्यांच्याकडे पाहिले जात होता. राज्यात सत्तेत असताना आर आर आबांनी सर्वसामान्यांच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले, ग्रामविकास मंत्री पासून गृहमंत्री, उपमुख्यमंत्री असताना कठोर पावले ही सर्वसामान्यांच्या भल्याच्या दृष्टीने टाकली होती. तंटामुक्ती अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, डान्सबार बंदी, अशा कित्येक योजना आबांनी सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर ठेवून राबवल्या. गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागाचे पालकमंत्री स्वीकारण्यापासून अनेक आव्हाने आर आर आबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये स्वीकारली होती. निष्कलंक चारित्र्य म्हणून आबांची राज्यातच नव्हे तर देशाची ओळख होते. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ गृहमंत्री पद भूषवणारे म्हणूनही आबांची एक ओळख आहे.