ETV Bharat / state

Singer Lata Mangeshkar : लता दीदींनी 'या' ठिकाणी गिरवले होते संगीताचे पहिले धडे - Lata Mangeshkar Passed Away

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) आणि मंगेशकर कुटुंबाचे सांगलीशी अतूट नाते होते. त्यांनी सांगली येथे संगितातील पहिले धडे गिरवले होते.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar
author img

By

Published : Feb 6, 2022, 2:26 PM IST

Updated : Feb 6, 2022, 3:34 PM IST

सांगली : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबाचे सांगलीशी अतूट नाते होते. सुमारे 14 वर्षं मंगेशकर कुटुंब हे सांगलीत वास्तव्यास होते. सांगली मधूनच गानकोकीळा लता मंगेशकर यांनी आपल्या गायनाचे सुरुवातीचे धडे गिरवले. त्यांनी आज (6 फेब्रुवारी) वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप (Lata Mangeshkar Passed Away) घेतला आहे. त्यांच्या आणि सांगलीच्या ऋणानुबंधाचा आज आढावा घेणार आहोत.

14 वर्षं मंगेशकर कुटुंब हे सांगलीत वास्तव्यास होते

गाणं म्हटलं की लता मंगेशकर हे एक समीकरण भारताच्या संगीत क्षेत्रात रुजू झालं होतं. त्यामुळेच त्यांना भारताची गानकोकिळा म्हणून ओळखलं जायचं. संगीताच्या क्षेत्रात अत्युच्च स्थानावर लता मंगेशकर नेहमीच राहिल्या, संगीताच्या क्षेत्रातल्या त्यांच्या प्रवासाची सुरुवात ही सांगलीतून झाली. गायनाचे सुरुवातीचे धडे लता दीदींनी सांगलीतच गिरवले होते.

सांगली शहर आणि मंगेशकर कुटुंबांचं नातं-

लता दीदीं आणि मंगेशकर कुटुंबाचे सांगलीशी घट्ट नाते राहिले आहे. लतादीदींचा आणि त्यांच्या पाच भावंडांचं बालपण सांगली शहरातच गेले. 14 वर्ष मंगेशकर कुटुंबीय हे सांगली शहरात वास्तव्यास होते. ते शहरातल्या एसटी स्टँड नजीक असणाऱ्या एका वाड्यात मंगेशकर कुटुंबीय राहत होतं. लतादीदींचे वडील दिनानाथ मंगेशकर यांनी अनेक संगीत नाटकांच्या रूपाने त्यांनी रंगभूमीची सेवा केली. त्यांनी त्यांच्या 'बळवंत सिनेटोन' कंपनी चा स्टुडिओ सांगलीच्या गणपती मंदिर परिसरात उभा केला होता. येथे अनेक संगीत नाटके, काही सिनेमे यांची निर्मिती केली.

गानकोकीळा लता मंगेशकर यांनी आपल्या गायनाचे सुरुवातीचे धडे सांगलीतच गिरवले आहेत. मंगेशकर कुटूंबियांचे घर असणाऱ्या गावभाग परिसरातील घराला त्याकाळी मंगेशकर चाळ असे संबोधिले जायचे. लतादीदीं ज्या शाळेत थोडेफार दिवस शिकल्या, ती शाळा तेथून जवळच असलेल्या मारुती चौकातील मुरलीधर मंदिराच्या जवळ होती. पालिकेच्या मुलींची शाळा क्रमांक 11 मध्ये त्यांनी काही काळ शिक्षण घेतले.

सांगलीतले ज्येष्ठ व्यापारी अरुण दांडेकर यांनी लतादीदी आणि त्यांच्या बहीण आशा दीदी यांच्या आठवणींना उजाळा देतांना सांगितलं, आशा या लहान असताना घरी दंगा फार करते म्हणून एक दिवस त्यांनी आशाला शाळेत नेले. पण खोडकर असणाऱ्या आशाने शाळेत असा काही दंगा घातला की, दोघींनाही घरी पाठवण्यात आले. त्या प्रसंगानंतर लतादीदी पुन्हा कधीही शाळेत गेल्या नाहीत. आज दुर्दैवाने त्यांची शाळा, घर आणि बळवंत सिनेटोन या कंपनीचा स्टुडिओ या वास्तू किंवा तिच्या पाऊलखुणा अस्तित्वात नाहीत, अशी आठवण अरुण दांडेकर यांनी सांगितली.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यानंतरच्या तीन भावंडांचा जन्म सांगलीत झालेला आहे. आशा ,उषा आणि ह्रदयनाथ मंगेशकर या तिघांचे जन्मस्थान हे सांगली आहे. मंगेशकर कुटुंबियांचा सांगलीमध्ये संगीत क्षेत्रात असणारे योगदान खुप मोलाचे आहे. ते पाहून सांगली नगरपालिकेने शहरात दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने एक नाटयगृह सुरू केलं, ते आज ही सुरू आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबासमवेत सांगली सोडल्यानंतर, त्या पुन्हा सांगली शहरात काही कामानिमित्ताने आल्या की त्यावेळी आवर्जून हरिपूर रोडवरील असणाऱ्या बागेतल्या गणपती मंदिरात जात असत. त्या ठिकाणी जाऊन त्या गणपती बाप्पांचे नेहमीच दर्शन घेत होत्या.

संगीत क्षेत्रात मंगेशकर कुटुंबाचे असणारे योगदान आणि त्यांची सांगलीची असणारी नाळ, हे लक्षात घेऊन त्यांचा सांगली शहरात यथोचित सत्कार व्हावा. या उद्देशाने सांगली महापालिकेच्या वतीने 2000 साली मंगेशकर भावंडांचा एक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. "मंगेशोत्सव" या संगीताची पर्वणी सांगलीकरांना लता दीदींच्या उपस्थितीमध्ये अनुभवायला मिळाली होती. तसेच पालिकेच्या वतीने लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर यासह पाच भावंडांचा सोन्याचे
मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता. अशी आठवण सांगली महापालिकेचे तत्कालीन महापौर सुरेश पाटील यांनी सांगितली.

Last Updated : Feb 6, 2022, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.