सांगली : कामगारांच्या विविध मागण्यांसाठी घरावर येणाऱ्या मोर्चामुळे कामगार मंत्र्यांचे धाबे दणाणल्याचे आज सांगलीत पाहायला (march of workers in Sangli) मिळाले. अखेर पोलिसांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील घरावर कोल्हापूर आलेल्या शेकडो कामगारांना स्थानबद्ध करत केवळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला लावून, कामगारांचा मोर्चा दडपल्याचा आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन संघटनेकडून करण्यात आला (police force to break up march)आहे.
बोनससाठी मोर्चा : राज्यातील कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस द्यावा त्याचबरोबर रद्द करण्यात आलेल्या विमा पॉलिसी पुन्हा सुरू करावी. यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कोल्हापूर संघटनेकडून कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील घरावर सोमवारी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार वंचित बहुजन माथाडीच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगार हे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी गाड्या भरून कोल्हापूर मधून निघाले. मात्र कामगार मंत्री खाडे यांच्या घरावर जाणारा हा मोर्चा सांगलीच्या वेशीवरच अडवण्यात (Kamgar morcha) आला.
पोलीस बंदोबस्त : अंकली या ठिकाणी सांगली पोलिसांनी कामगारांच्या या गाड्यांचा ताफा अडवत, त्यांना रोखून धरलं.मात्र कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला. ज्यातून सांगलीमध्ये या कामगारांना एकत्र येण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली,त्यानंतर अक्षरशा या कामगारांच्या गाड्यांचा ताफा पोलीस बंदोबस्तामध्ये शहरातल्या आंबेडकर स्टेडियम या ठिकाणी आणण्यात आला. तर या पार्श्वभूमीवर डॉ.आंबेडकर स्टेडियमच्या परिसरामध्येही मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला (Labor Minister Suresh Khade using police force) होता.
मोर्चा मोडीत काढला : तर पोलिसांच्या फौज फाट्यामुळे कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं मान्य केलं. त्यामुळे कामगार मंत्र्यांच्या घरावर काढण्यात येणारा जन-आक्रोश मोर्चा मोडीत निघाला. तर येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये कामगारांच्या मागण्यांच्या बाबतीत सरकारने गंभीर दखल घेऊन त्या मान्य कराव्यात. अन्यथा यापुढे मंत्रालयावर धडक मोर्चा काढू, असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदले यांनी यावेळी दिला (Workers March in Sangli) आहे.