ETV Bharat / state

कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; पालिकेचे दुर्लक्ष

शहरातील सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याने ती प्रदूषित होत आहे. सांगली शहारात जवळपास ३८ एमएलडी इतके सांडपाणी निर्माण होते. या पाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सांगली पालिका प्रशासनाची आहे. मात्र, पालिकेकडून यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाही.

sangli
कृष्णा नदीचे दृश्य
author img

By

Published : Dec 3, 2019, 10:26 AM IST

सांगली- स्वच्छ, निर्मळ समजली जाणारी सांगलीची कृष्णा नदी आता गटारगंगा झाली आहे. शहर महापालिकेचे नियोजनशून्य कारभार आणि प्रदूषण महामंडळाच्या अनास्थेमुळे शहरातले लाखो लिटर सांडपाणी दररोज नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.

कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबत माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

स्वच्छ समजली जाणारी कृष्णा नदी ही २२३ किलोमीटरचे अंतर कापून सांगली शहरात पोहोचते. मात्र, शहरातील सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याने ती प्रदूषित होत आहे. शहारात जवळपास ३८ एमएलडी इतके सांडपाणी निर्माण होते. या पाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सांगली पालिका प्रशासनाची आहे. मात्र, पालिकेकडून यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाही. परिणामी, शहरातील सांडपाणी प्रक्रिया न होता थेट कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत आहे.

शहरातील प्रसिद्ध अशा शेरी नाल्याच्या माध्यमातून हे सर्व सांडपाणी कृष्णा नदीत पोहोचते. शेरी नाल्याच्या भोवती सांगलीचे राजकारण राहिले आहे. इतकेच नव्हे तर, शेरी नाला हा निवडणुकीचा केंद्रबिंदू देखील राहिला आहे. युतीच्या काळात या नाल्याच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी धूळगाव योजना आखण्यात आली. याद्वारे नाल्याचे सांडपाणी उचलून ते स्वच्छ करून शेतीला देणे अपेक्षित होते. मात्र, ही योजना अनेक वर्षे रखडलेली. त्यानंतर ती पुन्हा उदयास आली. मात्र, निधी आणि तांत्रिक गोष्टींच्या अभावी ती बंद पडली. नुकत्याच आलेल्या महापुरात या योजनेला मोठे नुकसान झाले. आणि त्यानंतर ही योजना ठप्प पडली.

परिणामी, गेल्या काही महिन्यांपासून शेरी नाल्यातून शहरातील सांडपाणी कृष्णानदी पात्रात थेट मिसळत आहे. तसेच नदीकाठच्या शहरातील इतर काही भागातून पोहचणारे पाणीसुद्धा नदी पात्रात मिसळत आहे. कृष्णा नदीच्या वारंवार होणाऱ्या प्रदूषणावर अनेक वेळा सामाजिक संघटनांनी आवाज उठवला, आंदोलने केली. याची थोडीफार दखल सांगलीत अस्तित्वात असणाऱ्या प्रदूषण महामंडळाने घेतली. मात्र, पालिकेवर या प्रदूषण महामंडळाकडून केवळ थातूर-मातूर कारवाई करण्यात आली. कधी दंडात्मक कारवाई तर कधी नोटिसा बजावण्यात आल्या. सांडपाण्याच्या उपाययोजनेसाठी पालिका प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्याचा उद्योग करण्यात आला. मात्र, ठोस पावले न उचलल्याने कृष्णाचे पात्र प्रदूषितच राहिले. मात्र, आता नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर होत चालल्यामुळे पालिका प्रशासनाने वेळीच या मुद्द्याकडे लक्ष देऊन कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

हेही वाचा- जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीत एच.आय.व्ही जनजागृती प्रभात फेरी

Intro:
file name - mh_sng_2_krushna_nadi_pradushan_ready_to_air_7203751

स्लग - प्रदूषणाच्या विळख्यात कृष्णामाई ,शहराचे लाखो लिटर सांड-पाणी मिसळतय थेट कृष्णा नदीत..

अँकर - स्वच्छ,निर्मळ समजली जाणारी सांगलीची कृष्णा नदी आता गटार गंगा बनली आहे.सांगली महापालिकेचा नियोजन शून्य कारभार आणि प्रदूषण महामंडळाच्या अनास्थेमुळे शहरातलं लाखो लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात दररोज मिसळत आहे. त्यामुळे कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.जागतिक प्रदूषण दिनानिमित्त पाहूया कृष्णा नदीच्या प्रदूषणाची कथा...

Body:व्ही वो - 223 किलोमीटरचे अंतर पार करत कृष्णा नदी सांगली शहरात पोहचते.वाट्यात या कृष्णेला अनके प्रदूषनाची धक्के खावे लागतात,मात्र सांगलीत पोहचल्या नंतर स्वछ,निर्मळ कृष्णामाई गटारगंगा बनल्या शिवाय रहात नाही.कारण सांगली शहरातील सांड- पाणी थेट कृष्णा नदीत आता दररोज मिसळत आहे..सांगली शहारातील जवळपास 38 एमएलडी इतके सांड पाणी निर्माण होते.आणि या पाण्याच्या विल्हेवाटाचे सांगली पालिका प्रशासनाकडे ठोस उपाययोजना नाही,परिणामी हे सांडपाणी आता थेट कृष्णा नदीच्या पात्रात बिनधास्त पणे मिसळत आहे.

सांगली शहरातील प्रसिद्ध अश्या शेरीनाल्याची माध्यमातून हे सर्व सांडपाणी कृष्णा नदीत पोहचते. खरंतर शेरीनाल्याच्या प्रश्न वर्षानुवर्ष गंभीरच आहे.याच शेरीनाल्याच्या भोवती सांगलीचा राजकारण राहिले,इतकेच नव्हे तर निवडणुकीच्या केंद्रबिंदू सुद्धा अनेक वेळा शेरीनाल्याचा मुद्दा राहिला. आणि युतीच्या काळात या शेरीनाल्याच्या सांड पाण्याच्या विल्हेवाट लावण्यासाठी धुळगाव योजना आखण्यात आली. शेरीनाल्यातुन सांड पाणी उचलून ते स्वच्छ करून शेतीला देण्याची ही योजना आहे.मात्र अनेक वर्षे रखडलेली ही योजना काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आली,पण पुन्हा निधी आणि तांत्रिक गोष्टींच्या अभावी बंद पडली.नुकत्याच आलेल्या महापूरात या योजनेला मोठे नुकसान झाले. आणि त्यानंतर ही योजना ठप्प पडली.

परिणामी गेल्या काही महिन्यांपासून शेरीनाल्याच्या माध्यमातून शहरातील सांड पाणी कृष्णानदी पात्रात थेट मिसळत आहे.तसेच नदीकाठी शहरातील इतर काही भागातुन पोहचणारे पाणी ही आता नदीच्या पात्रात मिसळत आहे.

कृष्णा नदीच्या वारंवार होणारे प्रदूषण यावर अनेक वेळा सामाजिक संघटनांनी आवाज उठवला,आंदोलने केली.त्याची थोडीफार दखल सांगलीत अस्तित्वात असणाऱ्या प्रदूषण महामंडळाने घेतली सुद्धा, मात्र पालिकेवर या प्रदूषण महामंडळाकडून केवळ थातूर-मातूर कारवाई करण्यात आली.कधी दंडात्मक कारवाई तर कधी नोटिसा बजावण्यात आल्या.आणि पालिका प्रशासनाने सांडपाण्याचे उपाययोजना करण्यासाठी केवळ कागदी घोडे नाचविण्याचा उद्योग केला.त्यामुळे या कृष्णेच्या प्रदूषणाला आळा घालण्याची जवाबदारी असणाऱ्या प्रदूषण महामंडळाकडून अप्रत्यक्ष पालिकेला अभय देण्याचा उद्योग झाला आहे.

तर कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या, ना तर त्याला आळा घालण्यासाठी प्रदूषण महामंडळाने कठोर पाऊले उचलली.
परिणामी आजही स्वच्छ ,निर्मळ कृष्णा नदी प्रदूषित बनत चालली आहे.

त्यामुळे कृष्णा नदीत मिसळणारया सांडपाण्याचा गंभीर प्रश्ना बाबत पालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या नाही,तर लवकरच कृष्णा नदी गटारगंगा बनल्या शिवाय राहणार नाही,हे नक्की...

बाईट - संजय चव्हाण ,सामाजिक कार्यकर्ते ,सांगली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.