ETV Bharat / state

कृष्णेची पाणी पातळी जाणार 40 फुटांपर्यंत.. सांगलीत पूर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराचे आदेश - सांगलीत प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

ततधार पाऊसामुळे सांगली मध्ये कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. दोन दिवसात कृष्णा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. गुरुवारी रात्री सांगतील आयर्विन पूल येथील पाण्याची पातळी 30 फुटांपर्यंत पोहोचली होती. यामध्ये वाढ कायम असून शुक्रवारी सकाळपर्यंत कृष्णा नदीची पाण्याची पातळी 40 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज

कृष्णेची पाणी पातळी जाणार 40 फुटांपर्यंत

author img

By

Published : Jul 23, 2021, 6:54 AM IST

सांगली - कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी शुक्रवारी 40 फुटांवर जाण्याचे अंदाज पाटबंधारे प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून शहरातल्या पूर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश जारी केले आहेत.

सांगलीत पूर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराचे आदेश

पूर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना...संततधार पाऊसामुळे सांगली मध्ये कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. दोन दिवसात कृष्णा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. गुरुवारी रात्री सांगतील आयर्विन पूल येथील पाण्याची पातळी 30 फुटांपर्यंत पोहोचली होती. यामध्ये वाढ कायम असून शुक्रवारी सकाळपर्यंत कृष्णा नदीची पाण्याची पातळी 40 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज पाटबंधारे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन सांगली महापालिका प्रशासनाकडून शहरातील कृष्णाकाठच्या सखल भागात असणार्‍या नागरी वस्तीतील रहिवाशांना स्थलांतर होण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकेचे उपायुक्त यांच्यासह आपत्ती यंत्रणेच्या पथकाने पूर पट्ट्यात जाऊन स्थानिकांना स्थलांतरीत होण्याच्या आणि सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

पाणी पातळी 40 फुटांवर जाण्याचा अंदाज..सायंकाळी सात वाजेपर्यंत कृष्णा नदीची पाण्याची पातळी 27 फुटांपर्यंत पोहोचली होती आणि ही वाढ कायम असल्याने पालिकेच्या वतीने खबरदारी म्हणून पूर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे कार्यवाही सुरू केली. कृष्णा नदीची इशारा पातळीही 40 फूट तर धोका पातळी 45 फूट आहे. त्याचबरोबर कोयना धरणातून शुक्रवारी सकाळपासून 10 हजार क्‍यूसेक पाणी कृष्णा नदीपात्रात मध्ये सोडण्यात येणार आहे. तसेच संततधार पाऊस कायम असल्याने शुक्रवारी कृष्णा नदीची पाण्याची पातळी 40 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने पालिका प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून पूर पट्ट्यातला नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याबाबत उपाययोजनाही सुरू केले आहेत. त्याचबरोबर ज्या नागरिकांना राहण्याची सोय नाही, अशांसाठी पालिकेच्या शाळांमध्ये निवारा केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.