सांगली - शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 54.6 फुटांवर पोहोचली असून सध्या ती स्थिरावली आहे. मात्र, सध्यस्थितीत सांगली शहर हे जलमय झाले आहे. जवळपास साठ टक्के शहर कृष्णेच्या पुराच्या विळख्यात सापडले आहे. तर ताकारी आणि भिलवडी याठिकाणी कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरायला सुरुवात झाली आहे. सांगली शहरात आलेल्या पुराने 2005 मध्ये आलेल्या महापुराची पुनरावृत्ती झाल्याचे दृश्य सध्याच्या परिस्थितीत पाहायला मिळत आहे.
कृष्णाकाठाला दिलासा.. सांगलीत कृष्णा नदीची पातळी स्थिर, मात्र शहर जलमय - सांगली शहरात कृष्णेचे पाणी
सांगली शहरातील जवळपास एक हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर लाखो लोकांचं स्थलांतर या ठिकाणी झाले आहे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांच्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातल्या महापालिकांच्या शाळांमध्ये आणि इतर खासगी ठिकाणी तात्पुरते निवारा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत.
कृष्णाकाठाला दिलासा..