सांगली - काळजाचा थरकाप उडवणारीं घटना मिरजेच्या भोसे येथे घडली आहे. सिगरेट आणायला उशीर झाल्याच्या वादातून एका मित्राचा निर्घृण खून करत त्याचा मृतदेहाचे तुकडे कूपनलिकेत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दत्तात्रय झांबरे, असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.
सिगरेटचा राग जीवावर बेतला
मिरज नजीकच्या भोसे येथील पंढरपूर रस्त्यावरील कारखान्याच्या आवारात मृत दत्तात्रेय झांबरे अमोल खामकर,सागर सावंत आणि वैभवकुमार जाधव या मित्रांसमवेत पार्टी करण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती. त्याचा तपास करत असताना दत्तात्रयचा खून झाल्याचा संशय आला. त्यामुळे मिरज ग्रामीण पोलिसांनी चौकशीअंती संशयित सागर सावंत व अमोल खामकर यांनी दत्तात्रयच्या खुनाची कबुली दिली.
तुकडे करून टाकले कूपनलिकेत
घटनेच्या दिवशी मृत दत्तात्रय झांबरे याने मद्य पार्टी सुरू असताना आपला मित्र सागर व अमोल या दोघांना सिगरेट आणायला पाठवलं होतं. मात्र, सिगरेट घेऊन येण्यास दोघांना वेळ लागल्याने संतापलेल्या दत्तात्रयाने परतलेल्या सागर व अमोल यांना शिवीगाळ सुरू करत कोयता घेऊन दोघांच्या अंगावर धावून गेला. या दरम्यान सागर सावंत याने दत्तात्रय झांबरे याच्या हातातील कोयता हिसकावून घेत त्याला खाली पाडत त्याच्यावर वार केले. त्यानंतर अमोलने दत्तात्रयच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केले. यावेळेस वैभवकुमार जाधव याला सागर आणि अमोल यांनी निघून जाण्यास सांगितले. तसेच खुनाची माहिती कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.यानंतर सागर आणि अमोल या दोघांनी दत्तात्रेयाच्या मृतदेहाचे तुकडे करत कूपनलिकेत मृतदेहाचे सर्व तुकडे टाकले.
मित्राचा खून करत मृतदेहाला कूपनलिकेत; सांगलीतील धक्कादायक घटना - crime news
मिरज नजीकच्या भोसे येथील पंढरपूर रस्त्यावरील कारखान्याच्या आवारात मृत दत्तात्रेय झांबरे अमोल खामकर,सागर सावंत आणि वैभवकुमार जाधव या मित्रांसमवेत पार्टी करण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती.