ETV Bharat / state

Kavathemahankal Nagar Panchayat Election : एकाकी ज्युनिअर आर. आर. पाटलांना आता अजित पवारांची ताकद

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत दिवंगत आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटलांच्या विरोधीत सर्वपक्षीय आघाडी एकवटली आहे. विरोधकांना राष्ट्रवादीचा एक गटही मिळाला आहे. याची दखल अजित पवारांनी घेतल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी खडबडून जागी झाली आहे. राष्ट्रवादीने रोहित पाटलांच्या पाठिशी असल्याचे व पूर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Rohit r Patil
Rohit r Patil
author img

By

Published : Dec 17, 2021, 9:40 PM IST

Updated : Dec 17, 2021, 9:47 PM IST

सांगली - कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये (Kavathemahankal Nagar Panchayat Election) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पाटील यांच्या पाठीशी ठाम असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा राष्ट्रवादीकडून आता देण्यात आले आहे. रोहित आर.आर.पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधकांसोबत राष्ट्रवादीच्या एका गटाने एकत्र येत रोहित यांना एकाकी पाडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यात रोहित पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यात खळबळ उडाली, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गंभीर दखल घेतल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादीला आता जाग आली आहे.

रोहित पाटलांविरोधात सर्व विरोधक एकवटले..

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगर पंचायतीची (Kavathemahankal Nagar Panchayat Election) निवडणूक सध्या सुरू आहे. 21 डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडत आहे. पण संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे आता लक्ष लागून राहिले आहे. कारण या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजेच आर.आर.पाटील गटाविरोधात सर्वपक्षीय आघाडी अशी लढत होत आहे. राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एका गटाने एकत्र येत शेतकरी विकास आघाडी स्थापन केली आहे.

भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा कट्टर समर्थक सगरे गट आदी रोहित पाटलांच्या विरोधात एकवटले आहेत. त्यामुळे रोहित पाटील विरुद्ध सर्व विरोधक असे चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये रोहित आर.आर.पाटील यांनी निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभेमधून बोलताना विरोधकांना आपल्या शैलीतून चांगलाच इशारा दिला. पंचवीस वर्षाच्या तरुणाविरोधात सर्व जण एकत्र आल्याची भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केली. यावरून रोहित पाटील यांनी आपला वयाचा दाखला देत, आता माझे वय 25 नसून 23 आहे आणि पंचवीस होईपर्यंत विरोधकांच्याकडे काहीच शिल्लक ठेवत नाही, असा खणखणीत इशारा दिला.

हे ही वाचा - Ajit Pawar MSRTC Strike : सरकारच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका -अजित पवारांचा इशारा

अजित पवारांनी घेतली दखल..

रोहित पाटलांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा पातळीपासून राज्य पातळीवर याची जोरदार चर्चा सुरू झाली. खुद्द अजित पवार यांनी सर्व परिस्थितीची गंभीर दखल घेत रोहित पाटलांना लागेल ती मदत करण्याचे मुंबईत प्रसार माध्यमांसमोर जाहीर केले. त्यानंतर अजित पवारांनी रोहित पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत सर्व माहिती घेऊन लागेल ती मदत करण्याची हमी दिली. त्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आता खडबडून जागी झाली आहे. राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा अध्यक्ष अविनाश काका पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पाटील यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून पूर्ण ताकदीनिशी प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये निर्माण झालेली परिस्थिती आणि मतदानाला अवघे दोनच दिवस उरले असताना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद रोहित पाटील यांच्या पाठीशी उभी राहील का ? हा प्रश्न आहे..

रोहित पाटलांचा लागणार कस -

रोहित पाटील म्हणजे आर. आर. पाटील गटाला एकाकी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 13 जागांवर याठिकाणी रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढवत आहे. आता या निवडणुकीमध्ये रोहित पाटील म्हणजे आर.आर.पाटील गटाच्या किती जागा निवडून येणार ? बलाढ्य विरोधकांच्या ताकदीपुढे रोहित पाटील टिकणार का ? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे, मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचा कस लागणार आहे,हे नक्की..

Last Updated : Dec 17, 2021, 9:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.