ETV Bharat / state

सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांसह नेत्यांनी उडवला प्रचाराचा धडाका - काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत

भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच इतर राजकीय नेत्यांना पाचारण करून मतदारसंघातील कन्नड भाषिक मतदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न केला. प्रचाराला शेवटचे काही तास बाकी असल्याने उमेदवारांनी प्रचाराची कोणतीही संधी सोडली नाही.

सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांसह नेत्यांनी उडवला प्रचाराचा धडाका
author img

By

Published : Oct 19, 2019, 4:33 PM IST

सांगली - भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच इतर राजकीय नेत्यांना पाचारण करून मतदारसंघातील कन्नड भाषिक मतदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न केला. प्रचाराला शेवटचे काही तास बाकी असल्याने उमेदवारांनी प्रचाराची कोणतीही संधी सोडली नाही.

सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांसह नेत्यांनी उडवला प्रचाराचा धडाका

सांगली, जत, मिरज हे मतदारसंघ कर्नाटक राज्याच्या सीमेवर असल्याने या ठिकाणी कन्नड भाषिक मतदारांचा टक्का जास्त आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात कर्नाटक राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधकांनी चांगलेच रान उठवले. यंदा प्रचारादरम्यान कर्नाटक राज्याच्या नेत्यांचा वावर दिसून आला. तसेच अनेक ठिकाणी प्रचारामध्ये कन्नड भाषिक पाट्यांचा समावेश होता.

जत मतदारसंघात सर्वाधिक कन्नड भाषिक मतदार आहेत. तिन्ही मतदारसंघात भाजप व काँग्रेस उमेदवारांनी कर्नाटक राज्यातील आपआपल्या पक्षाच्या नेत्यांना पाचारण करून सभांचा धडका उडवून दिल्याचे पाहायला मिळाले,
जत मतदारसंघात भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांच्या प्राचारार्थ कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी व अन्य नेत्यांनी हजेरी लावत प्रचारसभा घेतल्या. याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच माजी मंत्री एम.बी पाटील या काँग्रेसच्या नेते मंडळींना आणून सभा घेतल्या.

तसेच सांगली विधानसभा मतदारसंघातही याचप्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली. भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठीही कर्नाटक भाजपने मदतीचा हात पुढे केला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनी येऊन प्रचाराचारात सहभाग घेतला.

काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज यांच्या दिमतीला कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या धावले, त्यांनीही याठिकाणी सभा घेऊन कन्नड भाषिक आणि धनगर समाजाला साद घातली.

Intro:File name - mh_sng_01_karnatak_nete_in_sangli_vis_01_7203751

स्लग - जिल्ह्यात यंदा कर्नाटकाच्या सत्ताधारी-विरोधकांनाही उडवला प्रचाराचा धडाका...

अँकर - सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह,विरोधी पक्षांचे नेत्यांनीही प्रचाराचा धडका उठवला.भाजपा आणि काँग्रेस उमेदवारांनी या नेत्यांना पाचारण करून जिल्ह्यातील कन्नड भाषिक मतदारांना आकर्षण करण्याचा यावेळी जोरदार प्रयत्न केला.Body:सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचारात यंदा कर्नाटक राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलाचं रान उठवले,जिल्ह्यातील कन्नड भाषिक पट्यात भाजपा आणि काँग्रेसच्या कर्नाटक राज्याच्या नेते मंडळींची वावर मोठ्या प्रमाणात दिसून आला.सांगली,जत,मिरज हा मतदारसंघ कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेले मतदार संघ आहेत.त्यामुळे याठिकाणी कन्नड भाषिक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर जत मतदार संघात सर्वाधिक कन्नड भाषिक मतदार आहेत.आणि या तिन्ही मतदारसंघात भाजपा व काँग्रेस उमेदवारांनी कर्नाटक राज्यातील आपआपल्या पक्षाच्या नेत्यांना पाचारण करून सभांचा धडका उडवून दिल्याचे पाहायला मिळाले,जत मतदार संघात भाजपाचे विद्यमान आमदार व उमेदवार विलासराव जगताप यांच्या प्राचारार्थ कर्नाटकचे मुख्यमंत्री येडुरप्पा,उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी,आदी नेत्यांनी हजेरी लावत प्रचार सभा घेतल्या.तर याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच माजी मंत्री एम.बी पाटील या काँग्रेसच्या नेते मंडळींना पाचारण करत सभाचा धडका उठवला,तर दुसरीकडे सांगली विधानसभा मतदारसंघातही अशीच स्थिती पाहायला मिळाली. सांगलीत भाजपाचे विद्यमान आमदार व उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठीही कर्नाटक भाजपा धावली,याठिकाणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनी येऊन प्रचाराचे रान उठवले,तर काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज यांच्या दिमतीला कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या धावले, त्यांनीही याठिकाणी सभा घेऊन कन्नड भाषिक आणि धनगर समाजाला साद घातली.याशिवाय कर्नाटकचे भाजपा आणि काँग्रेसचे नेते मंडळी याठिकाणी विविध पातळीवर आपल्या पक्षाचा प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.

आता पर्यंत जत या कन्नड भाषिक मतदार संघात छोट्या-मोठ्या प्रमाणात ज्या-त्या पक्षाचे आमदार-स्थानिक नेते निवडणूकीत प्रचार घेत असत,मात्र यंदाच्या या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसने जत पासून थेट सांगली पर्यंत कर्नाटकच्या आजी-माजी मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळाला प्रचाराच्या मैदानात उतरून कन्नड भाषिक मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.