ETV Bharat / state

दुष्काळाबाबत जिल्हा प्रशासन गंभीर नाही, जयंत पाटलांचा आरोप - drought

दुष्काळाबाबत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यांनी आज थेट आपल्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेटी दिल्या आहेत.

दुष्काळाबाबत जिल्हा प्रशासन गंभीर नाही, जयंत पाटलांचा आरोप
author img

By

Published : May 5, 2019, 2:08 PM IST

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज ( ५ मे) जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी दुष्काळी स्थितीबाबत जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचे ते म्हणाले. तसेच, सरकारने शेतकरी आणि पशुधन वाचवण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला.

दुष्काळाबाबत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यांनी आज थेट आपल्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेटी दिल्या आहेत. खानापूर तालुक्यातील गावांमधील पाण्या अभावी वाया गेलेल्या शेतात जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. तसेच आटपाडी नजीक सुरू झालेल्या चारा छावण्यांनाही भेटी दिल्या.

दुष्काळाबाबत जिल्हा प्रशासन गंभीर नाही, जयंत पाटलांचा आरोप

यावेळी शेतकऱ्यांनी पाटील यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला. यावेळी जयंत पाटील यांनी छावण्यांच्या सरकारी निकषांवर टीका केली. आज सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परस्थिती आहे. पाणी आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून आटपाडी तालुक्यात गेल्या महिन्यात दोन छावण्या सुरू केल्या, मात्र जत तालुक्यात अद्याप एकही छावणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळाकडे गंभीरपणे लक्ष देण्यात येत नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच सरकारने यामध्ये तातडीने पुढाकार घेऊन चारा छावण्यांच्या निकषामध्ये बदल करावेत आणि शेतकरी व पशुधन वाचवावे, अशी मागणी यावेळी केली.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Feed send - File name - R_MH_1_SNG_05_MAY_2019_J_PATIL_ON_DUSHKAL_SARFARAJ_SANADI - to - R_MH_4_SNG_05_MAY_2019_J_PATIL_ON_DUSHKAL_SARFARAJ_SANADI

स्लग - दुष्काळ बाबत जिल्हा प्रशासन गंभीर नाही,जयंतराव पाटलांचा आरोप,जिल्ह्यातील दुष्काळी भागाची केली पाहणी..

अँकर - सांगली जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती बाबत जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी करत सरकारने शेतकरी आणि पशुधन वाचवण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे.जयंतराव पाटील यांनी आज जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करत शेतकऱयांशी संवाद साधला,त्यावेळी ते बोलत होते. Body:व्ही वो - दुष्काळा बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत आज थेट आपल्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेटी दिल्या आहेत.खानापूर तालुक्यातील
गावांमधील पाण्या अभावी वाया गेलेल्या शेतात जाऊन जयंत पाटील यांनी पिकांची पाहणी करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.तसेच आटपाडी नजीक सुरू झालेल्या चारा छावण्यांनाही भेटी दिल्या.यावेळी शेतकरयांनी पाटील यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला.यानंतर बोलताना जयंतराव पाटील यांनी चारा छावण्यांच्या सरकारी निकषावर टीका करताना,एका शेतकरयाची ५ पेक्षा जास्त जनावरे घेणार,कमी चारा आणि खाद्य देणे,हा प्रकार म्हणजे शेतकरयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असून हे निकष बदलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असल्याचे स्पष्ट करत,आज सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परस्थिती आहे.पाणी आणि चारयाची टंचाई निर्माण झाली आहे.आणि प्रशासनाकडून आटपाडी तालुक्यात गेल्या महिन्यात दोन छावण्या सुरू केल्या,मात्र जत तालुक्यात अद्याप एकही छावणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली नाही.यामुळे जिल्हा प्रशासना कडून दुष्काळाकडे गंभीरपणे लक्ष देण्यात येत नाही.असा आरोप यावेळी जयंतराव पाटील यांनी केला आहे.तसेच सरकारने यामध्ये तातडीने पुढाकार घेऊन चारा छावण्यांच्या निकषामध्ये बदल करावेत आणि शेतकरी व पशुधन वाचवावे अशी मागणी यावेळी केली.

बाईट - जयंतराव पाटील - प्रदेशाध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.