ETV Bharat / state

जयंतरावांचे आगळेवेगळे फोटोसेशन.. चिमुकल्याच्या आग्रहाखातर दिली पोझ

अत्यंत साधा, मात्र आगळा वेगळा फोटोशूट आज सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे पार पडला. ६ वर्षीय रुद्र सागर जंगम यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढले तसेच त्यांना मंगलाष्टकाही म्हणून दाखवल्या.

unique photo session
जयंतरावांचे आगळेवेगळे फोटोसेशन
author img

By

Published : Dec 20, 2020, 3:11 PM IST

Updated : Dec 20, 2020, 3:25 PM IST

सांगली - लाईट्स.. कॅमेरा.. स्माईल.. असा कोणताही बडेजाव नसणारा अत्यंत साधा, मात्र आगळा वेगळा फोटोशूट आज सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे पार पडला. फोटोग्राफर होते ते ६ वर्षीय नवेखेड येथे राहणारे रुद्र सागर जंगम तर मॉडेल होते राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत राजाराम पाटील.

जयंतरावांचे आगळेवेगळे फोटोसेशन.

साहेब मला फोटो काढायचा आहे -

झालं असं की, आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे मंत्री जयंत पाटील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे मंत्री महोदयांचा ताफा पोहोचताच रुद्र सागर जंगम हा चिमुकला, मंत्री जयंतरावांकडे गेला आणि म्हणाला.. "साहेब.. मला आपला फोटो काढायचा आहे.. मंत्री जयंत पाटील यांनाही त्याचे कौतुक वाटले आणि त्यांनी होकार दिला. मग काय गड्याने जो काढला त्याला दाद देण्याशिवाय मंत्री महोदयांनाही राहवलं नाही. आणि बरं का.. रुद्र जंगम यांना मंगलाष्टकाही तोंडपाठ आहेत.. फोटो सेशन संपताच लागलीच गड्याने मंत्री महोदयांना मंगलाष्टकाही म्हणून दाखवली आणि मंत्री महोदयांसह उपस्थितांची वाह वाह मिळवली.

unique photo session
जयंतरावांचे आगळेवेगळे फोटोसेशन
राजकारणात चेहरा फार महत्वाचा. ज्या पक्षाकडे चेहरे त्याच पक्षाला सर्वाधिक मते हे जणू समीकरणच. फ्लेक्सवर रुबाबदार फोटो असलाच पाहिजे अशी नेत्यांची इच्छा असते. त्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. मात्र इस्लामपुरात पार पडलेले हे आजचे फोटोसेशन ह्रदयाला भिडणारे आहे. यात शंकाच नाही.

Last Updated : Dec 20, 2020, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.