ETV Bharat / state

इस्लामपूरच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांची बदली; अरविंद माळी यांची लागली वर्णी - जयंत पाटील न्यूज

इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना पुणे महापालिकेत सहायक आयुक्त पदावर बढती मिळाली आहे. पालघर येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी असलेल्या अरविंद माळी यांच्याकडे इस्लामपूर नगरपालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

islampur municipal council
इस्लामपूर नगरपालिका
author img

By

Published : Aug 13, 2020, 12:47 AM IST

इस्लामपूर (सांगली)- गेले वर्षभर शहरात आपल्या कामाची वेगळी छाप पाडून आणि सातत्याने चर्चेत राहिलेल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांच्या बदलीचा आदेश बुधवारी प्राप्त झाला. मंगळवारी रात्री उशिरा हे आदेश नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. पवार यांच्या बदलीची चर्चा गेले आठवडाभर शहरात जोरदार चर्चा सुरु होती. मुख्याधिकारी पवार यांची पुणे महानगरपालिकेमध्ये सहायक आयुक्तपदी बढती झाली आहे. इस्लामपूर पालिकेसाठी पालघर नगरपालिकेत मुख्याधिकारी असलेले अरविंद माळी यांची वर्णी लागली आहे.

pradnya potdar pawar
प्रज्ञा पोतदार-पवार

गतवर्षी जुलै महिन्यात मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची बदली होऊन प्रज्ञा पवार याठिकाणी रुजू झाल्या. इस्लामपूर पालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्याधिकारी म्हणून त्यांची नोंद झाली. त्या आल्या तेव्हा भाजपची सत्ता होती. पालिकेतही भाजप समर्थक विकास आघाडी सत्तेत असल्याने भाजप नेत्यांनी त्यांना खास प्रयत्न करून आणल्याची चर्चा होती. अगदी सुरुवातीच्या काळातच त्यांनी अद्याप कामकाजाला सुरुवात केली. त्याच दरम्यान लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामध्ये राज्यात सत्ताबदल होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत आली.

दरम्यान, मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोना विषाणू संसर्गाची महाराष्ट्रातील सुरुवात इस्लामपूर शहरातून झाली. एकावेळी सुमारे 26 लोक कोरोनाबाधित होते, त्यामुळे शहर देशभरात चर्चेत आले. देशातील महत्त्वाचे हॉटस्पॉट म्हणून शहराकडे सर्वांच्या नजरा होत्या. या कामात मुख्याधिकारी पवार यांनी दिवसरात्र झटून प्रयत्नांची पराकाष्ठा करत विविध उपाययोजना राबविल्या. त्यामुळे शहरात त्यांच्या कामाचे कौतुक झाले. 'लेडी सिंघम' म्हणून त्या चर्चेत आल्या. याच काळात राष्ट्रवादीचे नगरसेवक खंडेराव जाधव आणि त्यांच्यात झालेल्या वादावादीमुळे त्या आणखी चर्चेत आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना त्या सहकार्य करत नसल्याची नगरसेवकांची तक्रार होती.

माझ्या बदलीसंदर्भात मी स्वतः मंत्री जयंत पाटील यांच्याकडे विनंती केली होती. "सर्वांना विश्वासात घेऊन कुणा एकाची बाजू न घेता वर्षभरात शहरात चांगले व तटस्थपणे काम करु शकल्याचा आनंद आहे.", असे प्रज्ञा पोतदार-पवार यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.