ETV Bharat / state

कचरा कुंडीत फेकले पीपीई किट; नागरिकांनी फोडली रुग्णवाहिका

author img

By

Published : Apr 3, 2021, 3:24 PM IST

सांगलीच्या गणेशनगर स्विमिंग टॅंकच्या मागे असलेल्या महापालिकेच्या कचरा कुंडीत वापरलेले पीपीई किट टाकण्याचा प्रकार स्थानिकांनी उघडकीस आणला. यानंतर संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिका फोडल्याचा प्रकार घडला आहे.

ambulance vandalize ganeshnagar sangli
रुग्णवाहिका तोडफोड गणेशनगर

सांगली - सांगलीच्या गणेशनगर स्विमिंग टॅंकच्या मागे असलेल्या महापालिकेच्या कचरा कुंडीत वापरलेले पीपीई किट टाकण्याचा प्रकार स्थानिकांनी उघडकीस आणला. यानंतर संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिका फोडल्याचा प्रकार घडला आहे. महापौरांनी पीपीई किट प्रकरणी आदित्य डायग्नोस्टिक सेंटरला एक लाखाचा दंड ठोठावला आहे.

माहिती देताना सांगलीचे महापौर महापौर दिग्विजय सूर्यवंशी

हेही वाचा - कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करून काही होणार नाही - गोपीचंद पडळकर

पीपीई किट फेकले रस्त्यावर..

सिव्हील रुग्णालय समोर असणाऱ्या आदित्य डायग्नोस्टिक सेंटरची रुग्णवाहिका (क्र. एमएच 08 डब्ल्यू 4601) ही काल सायंकाळी महापालिकेच्या कचरा कुंडी जवळ आली. येथे रुग्णवाहिका चालक प्रकाश अवघडे हे रुग्णवाहिकेतील कचरा पालिकेच्या कचरा कुंडीत टाकत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. रुग्णवाहिकेत डायग्नोस्टिक सेंटरमध्ये वापरलेले 3 पीपीई किट आणि अन्य वैद्यकीय कचरा होता. स्थानिक नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केला व रुग्णवाहिका रोखून धरली.

महापौरांनी ठोठावला 1 लाखाचा दंड..

घटनास्थळी वादावादीचा प्रकार घडला व संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या. यानंतर स्थानिक नगरसेवक फिरोज पठाण, बिरेंद्र थोरात यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना बोलावून घेतले. सूर्यवंशी यांनी तातडीने आरोग्य निरीक्षक अंजली कुदळे यांना बोलावून घेऊन संबंधित डायग्नोस्टिक सेंटरला 1 लाखाचा दंड ठोठावला. तसेच, मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून आदित्य डायग्नोस्टिकचा परवाना रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले.

हेही वाचा - म्हैसाळमध्ये धुमाकूळ घालत गवा रेड्याने केली पीकांची नासाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.