सांगली - तरुणीच्या गळ्याला चाकू लावून घर लुटल्याची थरारक घटना घडली आहे. मिरजेच्या सुभाषनगरमधील एका घरात ही धाडसी चोरी झाली असून यावेळी चोरट्यांना घरातील पाच तोळे सोने आणि चांदीचे दागिने व रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे.
तरुणीच्या गळ्याला चाकू लावून लुटले...
सुभाषनगर येथील हुळळे प्लॉट येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास अविनाश बाबासाहेब गडदे यांच्या घरात चोरीचा प्रकार घडला आहे. गडदे कुटुंब गाढ झोपेत असताना त्यांच्या मागील दरवाज्याला भोक पडून चोराट्यानी घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी अविनाश यांची बहीण वर्षा गडदे यांच्या खोलीत प्रवेश केला व तिजोरी उघडत असताना आवाज झाला. त्यावेळी वर्षा यांना जाग आली. त्यानंतर चोरट्यानी वर्षा गडदे हिच्या गळ्याला चाकू लावून चावी मागून घेतली आणि तिजोरीतील पाच तोळे सोने, चांदी चाळीस ग्रॅम आणि 47 हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरट्यानी पलायन केले.
चोर पळून गेल्यानंतर भयभीत झालेल्या वर्षा गडदे यांनी आरडाओरडा केला. या घटनेची माहिती मिळताचं मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असल्याचे मिरज पोलिस उपधीक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 14 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थीं संतप्त, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको