ETV Bharat / state

जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीत एच.आय.व्ही जनजागृती प्रभात फेरी - जागतिक एड्स दिन

जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीत आज एच.आय.व्ही. एड्स जनजागृती प्रभात फेरी पार पडली. यावेळी शहरातील अनेक संस्था, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

जनजागृती प्रभाग फेरी
जनजागृती प्रभाग फेरी
author img

By

Published : Dec 1, 2019, 3:29 PM IST

सांगली - जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीत आज एच.आय.व्ही एड्स जनजागृती प्रभात फेरी पार झाली. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती सांगली यांच्यावतीने आयोजित या रॅलीमध्ये शासकीय कर्मचारी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सांगलीत एच.आय.व्ही. जनजागृती प्रभात फेरी

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयापासून या रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या फेरीत सांगलीतील सामजिक संघटना, शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि शासकीय, पालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. स्टेशन चौक येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांना पथनाट्य सादर केले. तसेच शासकीय रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता प्रदीप दीक्षित व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी एड्स जनजागृती बाबत सामूहिक शपथ घेण्यात आली.

तसेच या रॅलीत सहभागी झालेल्या शोले स्टाईल दुचाकीने सर्वांचे लक्ष वेधले होते. तर गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील एच.आय.व्ही. एड्स रुग्णांची वाढलेली संख्या होती. पण, जनजागृतीमुळे एड्सचे रूग्ण कमी झाल्याचे यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

हेही वाचा - हैदराबादमधील बलात्कार प्रकरणाचा सांगलीतही निषेध; नराधमांना फाशीची मागणी

Intro:
Feed send mail - mh_sng_01_aids_ryalli_vis_01_7203751 -to -
mh_sng_01_aids_ryalli_byt_03_7203751

स्लग - जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीत पार पडली एच.आय.व्ही.एड्स जनजागृती प्रभात फेरी...

अँकर - जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीत आज एच.आय.व्ही.एड्स जनजागृती प्रभात फेरी संपन्न झाली.महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती सांगली यांच्यावतीने आयोजित या रॅली मध्ये शासकीय कर्मचारी शालेय व महाविद्यालया विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयापासून या रॅलीला सुरवात झाली.शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या फेरीत सांगलीतील सामजिक संघटना,शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि शासकीय, पालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.स्टेशन चौक येथे या रॅलीचा समारोप झाला.यावेळी विद्यार्थ्यांना पथनाट्य सादर केले.तसेच शासकीय रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता,प्रदीप दीक्षित व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी एड्स जनजागृती बाबत सामूहिक शपथ घेण्यात आली.तसेच या रॅलीत सहभागी झालेल्या शोले स्टाईल दुचाकीने सर्वांचे लक्ष वेधले होते.तर गेल्या काही वर्षांनी पासून जिल्ह्यातील एच.आय.व्ही.एड्स रुग्णांचे वाढलेली संख्या,विविध स्तरावरुन करण्यात येते असलेल्या जनजागृतीमुळे अत्यंत कमी झाल्याचे यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी सांगितले.

बाईट - डॉक्टर संजय साळुंखे - वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय , सांगली.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.