सांगली - जत तालुक्यासह जिल्ह्यात परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे प्रशासनाला सोबत घेवून शनिवार (दि.१७आक्टोबर ) जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास हिरावून घेतल्यासारखी परिस्थिती झाली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून सरकार शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी दिली. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामा करण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री जयंत पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, जतमधील शेतकऱ्याशी साधला संवाद - सांगली पालकमंत्री जयंत पाटील बातमी
पीक किती दिवसापासून पाण्यात आहे, किती नुकसान झाले आहे, आपले क्षेत्र किती आहे, याबाबत विचारणा केली. मका या पिकाची पावसामुळे कणसावरच मक्याची उगवण झाल्याचे निरीक्षण केले. दरम्यान, याबाबत मंत्री पाटील यांनी उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांना नुकसानग्रस्त फळबागांना विमा भरपाई मिळणे विषयी कोणता पाठपुरावा सुरू आहे, डाळींब बागा कोणत्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आहेत, याची विचारणा मंत्री पाटील यांनी केली.