सांगली - जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघात मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये नवरदेवाने लग्नगाठ बांधण्याआधी लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेत मतदानाचा हक्क बजावला. शहरी व ग्रामीण भागात सकाळच्या वेळी चांगले मतदान झाले.
नेमके मतदानाच्या दिवशीच एका युवकाच्या लग्नाची धावपळ सुरू होती. मात्र, नवरदेव असलेल्या या युवकाने लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी मतदान केंद्रात जावून मतदानाचा हक्क बजावत देशाप्रती असलेले कर्तव्य बजावले.
आधी लग्न लोकशाहीचे, असा निर्धार करत संतोष प्रकाश पाटील या नवरदेवाने चक्क घोड्यावरून मतदान केंद्र गाठत मतदानाचा हक्क बजावला. सोबत बँड बाजा घेऊन संतोषने शिराळा तालुक्यातील काळुंद्रे येथे मतदान केले आहे.