ETV Bharat / state

फी भरण्यासाठी भावी इंजिनियरनं फोडलं मोबाईलचं दुकान; 54 मोबाईल लंपास, परिस्थितीनं हतबल केल्याची कबुली - ARRESTED ENGINEERING STUDENT

महाविद्यालयाची फी भरण्यासाठी भावी इंजिनियरनं मोबाईल शॉपी फोडून तब्बल 54 मोबाईल चोरल्यानं खळबळ उडाली. या भावी इंजिनियरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Arrested Engineering Student
चोरी करताना भावी इंजिनियर (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2024, 1:54 PM IST

नवी मुंबई : इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्यानं मोबाईलच्या दुकानात भावी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भावी इंजिनियरला अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेले मोबाईल जप्त केले आहेत. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. परिस्थितीनं हतबल केल्यानं मोबाईल दुकान फोडून महाविद्यालयाची फी भरायची होती, अशी कबुली या भावी इंजिनियरनं पोलिसांकडं दिली. मोबाईल दुकान फोडीचं कारण ऐकूण पोलीस देखील हळहळले.

काय आहे प्रकार : नवी मुंबई परिमंडळ 2 च्या हद्दीतील पनवेल येथील मोबाईलचे दुकान फोडण्यात आले. या दुकानातून तब्बल 54 मोबाईल चोरीला गेले होते. याप्रकरणी मोबाईल दुकानदारानं पनवेल शहर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. दुकान मालकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं आरोपीची ओळख पटवली आणि चोरट्याला गुन्हे शाखेनं अटक केली. आरोपीकडं चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. आपण अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असून अंतिम वर्षात असल्याचं त्यानं यावेळी पोलिसांना सांगितलं. महाविद्यालयाची फी भरण्यासाठी आपल्याकडं पैसे नव्हते. त्यामुळे वर्ष वाया जाऊ नये, या भितीतून मोबाईल दुकान फोडून चोरी केल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली.

पोलिसांनी 41 मोबाईल केले जप्त : पोलिसांनी या भावी इंजिनियरच्या ताब्यातून सुमारे 41 मोबाईल जप्त केले आहेत. आरोपी तरुणाला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे तो तरुण चोरी केलेले मोबाईल विकून फी भरणार होता, असंही त्यानं कबुली जबाबात सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. मोबाईल चोरी करणाऱ्या उत्तरप्रदेशच्या टोळीतील दोघांना अटक; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त - Mobile shop theft In Nagpur
  2. बंदुकधारी दरोडेखोरांवर सराफाचा धैर्यानं लाठी घेऊन हल्ला, नागरिकांच्या मदतीनं एकाला अटक - Thane Crime News
  3. शोरुम फोडण्यापूर्वी 'भगदाड गँग' काय करायची? पोलिसांना चकवा देण्याकरिता चक्रावून जाणारे कारनामे - Thane Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.