ठाणे : मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलं. त्यांनी गेल्या अडिच वर्षा केलेल्या कामामुळं लोकांची सेवा करता आली हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, असं सांगितलं. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मोदी साहेबांनी दिली, त्यांचे आभार यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांनी मानले. यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचा कोणताही उमेदवार असेल, त्याला आपला पाठिंबा असेल असं सांगून एकनाथ शिंदे यांनी सध्या तरी मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडल्याचं स्पष्ट केलं. तसंच उद्या दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर बैठक होईल, त्यावेळी निर्णय होईल असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
जनतेचा महायुतीवर विश्वास : "महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला. असा विजय यापूर्वी कधी मिळाला नव्हता. त्यामुळं मी संपूर्ण जनतेचे आभार व्यक्त करतो. महायुतीवर जनतेनं विश्वास दाखवला. निवडणुकीच्या काळात मी 80 ते 100 प्रचार सभा घेतल्या," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे.
- मतदाराना जनतेला पुन्हा एकदा धन्यवाद, मतदारांचे आभार
- ही लँडस्लाईड व्हिक्टरी आहे.
- अडिच वर्षात महायुतीनं केलेलं काम, आणि लोकानी दाखवलेला विश्वास, काम आम्ही पुढे नेली.
- कल्याणकारी योजना आणि विकासाची सांगड आम्ही घातली. त्यामुळे मोठा विजय झाला, हा जनतेचा विजय आहे.
- मी ८०-९० सभा घेतल्या. पायाला भिंगरी लाऊन एक साधा कार्यकर्ता जसं कार्य केलं तसंच कार्य केलं.
- आजही मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून काम केलं.
- मी कॉमन मॅनसाठी जनतेसाठी काही ना काही केलं पाहिजे. शेतकरी कुटुंबातून मी आलोय.
- अधिकार आल्यावर सर्वसामान्यांसाठी काम करीन असं ठरवलं होतं. तेच केलं.
- सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्याला गरिबांचं दुःख कसं कळेल.
- लाडकी बहीण, लाडका भाऊ या सगळ्यांसाठी एक इकोसिस्टिम तयार झाली.
- अडिच वर्षे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मोदी साहेबांनी दिली, त्यांचे आभार.
- लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ ही माझी एक ओळख निर्माण झाली.
- कोट्यवधी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख निर्माण झाली. ही मला सगळ्यात मोठी कमाई वाटते.
- आत्तापर्यंतच्या विजयामध्ये यावेळचा विजय ही ऐतिहासिक कामगिरी ठरत आहे.
- आम्ही जीव तोडून काम केलं, मनापासून काम केलं. मी असेन, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, सगळ्यांनी काम केलं.
- लाडक्या बहिणी, लाडके भाऊ कामाला लागले. त्यांना काम मिळालं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.
- हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून जी काही माझी ओळख निर्माण झाली ती मोठी बाब आहे.
- रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत काम करत राहणार. लोकप्रियतेसाठी काम केलं नाही. कामं केल्यानं लोकप्रियता मिळाली.
- राज्यात मोठा विजय मिळाला तरी, कुठे घोडं अडलंय असे वाटत असेल, तर तसं नाही.
- मी मोदी साहेबांना फोन करुन सांगितलं की, सरकार बनवताना काही अडचण आहे, असं वाटत असेल तर तसं मानू नका.
- त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल.
- काल मोदींना, अमित शाह यांनाही फोन केला. सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर नसेल, असं त्यांना सांगितलं.
- आता आपली जबाबदारी वाढली आहे. अडिच वर्षात जे काम केलं, त्यापेक्षा मोठं काम करावं लागेल.
- अभी तो नापी है सिर्फ मुठ्ठीभर जमीन अभी तो सारा आसमान बाकी है, असंही शिंदे यांनी सांगितलं.
- भाजपा जो निर्णय घेईल त्याला पूर्णपणे शिवसेनेचं पूर्णपणे समर्थन असेल.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला. अद्याप राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? याची घोषणा महायुतीकडून करण्यात आलेली नाही. एकीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं निवडणूक लढवली त्यामुळं तेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी शिवसेना पक्षातील नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे, निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळालाय, त्यामुळं भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर लवकरच भेटेल. आमचे पक्षश्रेष्ठी एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील. आधी मुख्यमंत्री ठरेल, त्यानंतर इतर मंत्री ठरवले जातीस."
हेही वाचा
- साईबाबा संस्थानवर नव्याने विश्वस्त मंडळ येणार; राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या साई संस्थानच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी?
- 'एकनाथ शिंदे म्हणतील देवेंद्र फडणवीस यांना करा मुख्यमंत्री'; चंद्रकांत पाटलांनी कशामुळे व्यक्त केला विश्वास
- 'हे' फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे; अमित ठाकरेंची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत