ETV Bharat / state

Gopichand Padalkar Criticize Sanjay Raut : संजय राऊतांचं 'झिंग झिंग झिंगाट' झालंय - आमदार गोपीचंद पडळकर

author img

By

Published : Jan 29, 2022, 1:36 PM IST

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचं 'झिंग झिंग झिंगाट' झालं आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ( Gopichand Padalkar Criticize Sanjay Raut ) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या नावाचा वापर करून वाईनचे समर्थन करण्यात येत आहे.

gopichand padalkar and sanjay raut
गोपीचंद पडळकर आणि संजय राऊत

सांगली - शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचं 'झिंग झिंग झिंगाट' झालं आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ( Gopichand Padalkar Criticize Sanjay Raut ) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या नावाचा वापर करून वाईनचे समर्थन करण्यात येत आहे. मात्र, शरद पवार हे महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत, अशी प्रतिक्रियाही आमदार पडळकरांनी दिली. ( Gopichand Padalkar on Sharad Pawar over Wine Salling Decision ) ते सांगलीच्या झरे येथे बोलत होते. ( Gopichand Padalkar in Sangli Zare )

याबाबत बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर

राऊतांचं 'झिंग झिंग झिंगाट' झालंय -

राज्यात मॉल आणि किराणामाल दुकानात वाईन विक्रीचा निर्णय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे. राज्यभरात या निर्णयाचे त्याचे संतप्त पडसाद उमटत आहेत. वाईन विक्रीच्या समर्थनाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पडळकर म्हणाले, 'जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत फडणवीस खुलासा करतील. त्यामुळे राऊतांचं 'झिंग झिंग झिंगाट' झालं आहे, अशी टीका आमदार पडळकर यांनी केली.

आघाडी काळात शेतकऱ्यांवर अन्याय -

जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का? की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार, परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही, असा टोला लागवला.

हेही वाचा - Sanjay Raut On Devendra Fadnavis : संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, "भाजपा सरकारने दारुची होम डिलिव्हरी..."

शरद पवार वाईन विक्रीला समर्थन देणार नाहीत -

शरद पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करत आहेत. मला खात्री आहे की, जे शरद पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे. त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.