सांगली - जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथील एका घरात शेळीने दोन पायांच्या पिल्लाला जन्म दिला आहे. 20 दिवसांचे हे पिल्लू आता चालायला लागले असून दोन पायांवर चालनारे हे पिल्लू बघ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.
किर्लोस्करवाडी येथील विजय माळी या कामगाराच्या घरात एका शेळीने दोन पायाच्या पिल्लाला जन्म दिला आहे. 20 दिवसांपूर्वी माळी यांच्या शेळीने या पिल्लाला जन्म दिला. या पिल्लाला जन्म दिल्यानंतर शेळीचा मृत्यू झाला. मात्र, हे दोन पायाचे आई नसलेले पिल्लू अजूनही सुखरूप आहे. फक्त दूध पिऊन जिवंत असलेल्या या पिल्लाचा सांभाळ विजय माळी पोटच्या मुलाप्रमाणे करत आहेत. हे पिल्लू आता 20 दिवसांचे झाले असून दोन पायांवर धावायला लागले आहे. तर दोन पायांवर धावणाऱ्या या पिल्लाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.