ETV Bharat / state

तब्बल ४६ तासानंतर 'त्या' चिमुकलीचा मृतदेह सापडला - रामलिंग बेट सातारा बातमी

वाळवा तालुक्यात बहे येथून बुधवारी कृष्णा नदीच्या पात्रातून पाच वर्षांची चिमुरडी वाहून गेली होती. सलग तीन दिवस तिला शोधण्याकरता रेस्क्यू टीम कार्यरत होती. तिचा मृतदेह तब्बल ४६ तासांनी आज दुपारी नदी पात्रातील झुडपात सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

...'त्या' चिमुकलीचा मृतदेह तब्बल ४६ तासांनी आढळला

author img

By

Published : Jun 26, 2020, 7:55 PM IST

सातारा : लॉकडाऊनमधील कंटाळा दूर करण्यासाठी महिलांनी एकत्रित काढलेली सहल चिमुकलीच्या जीवावर बेतल्याचे आज स्पष्ट झाले. 'त्या' चिमुकलीचा मृतदेह शुक्रवारी दुपारी तब्बल ४६ तासांनी नदी पात्रातील झुडपात सडलेल्या अवस्थेत आढळला. जेनिषा भवरलाल पोरवाल (वय ५) असे या मुलीचे नाव आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बहे येथून बुधवारी कृष्णा नदीच्या पात्रातून पाच वर्षांची चिमुरडी वाहून गेली होती. निसर्गरम्य रामलिंग बेटावर खेळणारी मुलगी डोळ्यादेखत जोरदार पाण्याच्या प्रवाहातून वाहत गेली होती. बुधवारी बोरगाव येथून बोटीतून तरुणांनी शोधकार्य करताना जेनिषा हिने पाठीवर अडकवलेली सॅक नदी पात्रात मिळून आली. मात्र, चिमुकली सापडत नव्हती. रेस्क्यू टीम तीन बोटींसह सलग तीन दिवस शोध मोहीम करत होते. स्थानिक नगरसेवक अमित ओसवाल, माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या गावातील आपल्या मित्र परिवाराला माहिती देत सतर्कता म्हणून नदीकाठी शोध मोहीम राबवली.

जेनिषाचा शोध घेण्यासाठी इस्लामपुरातील ३० हून अधिक तरुण पोलिसांच्या मदतीने शोध कार्य करत होते. शुक्रवारी पहाटे जोराचा पाऊस पडला असल्याने शोधकार्य सुरू करायला उशिर झाला होता. बोरगाव, खरातवाडी येथील नदी पत्रात शोध कार्य राबवले होते. बोट घेवून सर्व तरुण जेनिषा हिचा शोध घेत असताना अखेर आज ती मृतावस्थेत सापडली.

पोरवाल कुटुंबाचे इस्लामपूर लाल चौक परिसरातील कन्या शाळे जवळ शालिमार कापड दुकान आहे. या कुटुंबातील महिलांसह परिसरातील आठ-दहा महिलानी एकत्रित येऊन बुधवारी रामलिंग बेट परिसरात छोटीसी ट्रिप काढली होती. दुपारच्या दरम्यान सर्व महिला चार चाकीतून बेटावर फिरण्याठी गेल्या. त्यानंतर, सायंकाळी साडे चारच्या सुमारास मंदिर परिसरात असणाऱ्या हेलिपॅडजवळ सर्व महिला एकत्रित आल्या. दरम्यान, खेळत असणारी जेनिषा नदी पात्रात पडली असता आरडाओरडा करत गटांगळ्या खात होती. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती प्रवाहासंगे वाहून गेली. डोळ्यासमोर मुलगी वाहून गेल्याने आईने आक्रोश केला. महिलांनी आरडाओरडा केला पण तिथे कोणी पुरुष व्यक्ती नसल्याने महिला घाबरून गेल्या होत्या. यातील एका महिलेने हा प्रकार तातडीने पोरवाल कुटुंबाला कळविला. घाबरलेल्या अवस्थेत लाल चौक, गांधी चौक परिसरातील तरुणांनी रामलिंग बेटावर धाव घेतली.

हसत खेळत घरी वावरणारी आपली एकुलती एक मुलगी जेनिषा हिचा मृतदेह आढळल्याने वडील भवरलाल यांच्यासह कुटुंबाने आक्रोश केला. त्यांची अवस्था पाहून अनेकांचे डोळे पाणावले. जेनिषा ही विद्यानिकेतन स्कूलमध्ये युकेजीच्या वर्गात शिकत होती. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.