सांगली: पिसाळलेल्या कोल्ह्याने चौघा जणांवर हल्ला करत Fox Attack Sangli लचके तोडल्याची घटना घडली आहे. पलूस तालुक्यातल्या आंधळी येथे हा प्रकार घडला आहे. त्यानंतर काही वेळाने एका शेतामध्ये पिसाळलेला कोल्हा मृत अवस्थेत आढळून आला. त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
हल्ला केल्याची घटना पलूस तालुक्यातल्या आंधळी गावांमध्ये एका पिसाळलेल्या कोल्ह्याने चौघ जणांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका तरूणीसह तिचे आई, आजी आणि आजोबा हे जखमी झाले आहेत. सानिका महेश सावंत ( वय 17), आई शीतल सावंत (वय 38), आजोबा सुरेश देसाई (वय 58) आणि आजी सरस्वती देसाई (वय 55) अशा जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये Sangli Government Hospital उपचार करण्यात आले आहेत.
आरडाओरडा सुरू केला सानिका दळपाण्यासाठी गेली होती, आणि दळप घेऊन घरी परतत असताना, घराच्या मागील बाजूस दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने सानिका हिच्यावर झडप मारली. ज्यामुळे सानिका हिने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर सानिकाची आईसह आजी आणि आजोबा धावून आले. मात्र यावेळी पिसाळलेल्या कोल्ह्याने सानिकासह तिची आई आणि आजी,आजोबांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.
शुक्रवारी सदरची घटना घडली होती. त्यानंतर गावामध्ये पिसाळलेल्या कोल्ह्याने दहशत निर्माण झाली होती. मात्र शनिवारी सावंत यांच्या घराशेजारी असणाऱ्या एका शेतामध्ये हा पिसाळलेला कोल्हा मृत अवस्थेमध्ये आढळून आला. त्यामुळे पिसाळलेल्या कोल्ह्याच्या हल्ल्याने भयभीत झालेल्या आंधळी ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.