ETV Bharat / state

हे तर चुकीचे निर्णय घेणारे स्थगिती सरकार; धनंजय महाडिकांची टीका - sangali latest news

कोरोनाच्या नावाखाली अनेक भ्रष्टाचार महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आल्याचा आरोप महाडिक यांनी केला आहे. तसेच राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्येही या सरकारने योग्य भूमिका घेतली नाही, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका महाडिक यांनी केली आहे.

धनंजय महाडिकांची टीका
धनंजय महाडिकांची टीका
author img

By

Published : Nov 23, 2020, 8:03 PM IST

Updated : Nov 23, 2020, 8:33 PM IST

सांगली - राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. कोरोना परस्थिती हाताळण्यापासून मराठा आरक्षण लागू करण्यापर्यंत हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला काम करणारे सरकार नव्हे तर 'स्थगिती' देणारे सरकारच म्हणावे लागेल. अशी टीका माजी खासदार आणि भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांनी केली आहे. सांगलीमध्ये पार पडलेल्या पदवीधर मेळावा प्रसंगी ते बोलत होते.

पदवीधर निवडणुकीचे संग्राम -

भाजपाचे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्राम सिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ सांगली मध्ये भाजपाचा पदवीधर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला कोल्हापूरचे भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांच्यासह सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर ,आमदार सुधीर गाडगीळ भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातल्या विश्रामबाग येथील खरे क्लब हाऊस मध्ये पार पडलेल्या या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडी सरकारवर भाजपच्या सर्वच नेत्यांनी सडकून टीका केली.

हे तर चुकीचे निर्णय घेणारे स्थगिती सरका
कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार-

यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. कोरोनाच्या संकटामध्ये राज्य सरकारला परिस्थिती हाताळता आली नाही. त्याशिवाय कोरोनाच्या नावाखाली अनेक भ्रष्टाचार महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आल्याचा आरोप महाडिक यांनी केला आहे. तसेच राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्येही या सरकारने योग्य भूमिका घेतली नाही, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका महाडिक यांनी केली आहे. पदवीधर मतदारसंघातल्या भाजपाच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन यावेळी महाडिक यांनी केले आहे.

लाईट बिल या स्थगिती सरकारची जबाबदारी नाही का?

विविध बाबींमुळे सरकारच्या विरोधात जनतेत मोठा रोष आहे. या सरकारला काम करणारे सरकार नव्हे तर 'स्थगिती' देणारे सरकारच म्हणावे लागेल. तसेच या सरकारला वाढीव वीज बिल हे माझी जबाबदारी वाटत नाही, का असा टोलाही महाडिक यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.

हे तर टग्यांचे सरकार - गोपीचंद पडळकर

तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले,'सर्वांच्या विश्वासावर ही निवडणूक लढली जाते. यामध्ये कार्यकर्त्यांना महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. ही निवडणूक कोणाच्या विरोधात नसून विश्वासघाताच्या विरोधात आणि जातीयवाद्यांच्या विरोधात आहे. विरोधकांनी फडणवीसांना व्हिलन करण्याचा प्रयत्न केला पण ते हिरो ठरले. एकत्र आलेल्या पक्षांकडे विचारधारा नाही. त्यांनी शेतकऱ्यांचा तसेच जनतेचा विश्वासघात केला आहे. कोरोनाकाळात मृत्युमखी पडलेल्या योध्यांना सरकारनं कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. हे सरकार एकही योजना सांगू शकत नसल्याची टीका पडळकरांनी केली.

जयंत पाटील स्वतः पदवीधर असूनही ते स्वतःची नोंदणी करू शकले नाहीत आणि त्यांनी पद्वीधरची निवडणूक हातात घेतली आहे. हे टग्यांचे सरकार आहे. या निवडणुकीत या टग्यांना पळवून लावा. जातीयवाद्यांना हद्दपार करण्यासाठी मतदान करा, असेही आमदार पडळकर म्हणाले.

Last Updated : Nov 23, 2020, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.