सांगली : माजी राज्यपाल राम नाईक काल आटपाडी येथे पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. औरंगाबाद नामांतरणप्रकरणी शरद पवारांनी केलेल्या विधानावर माजी राज्यपाल नाईक म्हणाले की, शरद पवारांना ( NCP Chief Sharad Pawar ) औरंगाबादच्या नामांतराविषयी कल्पना नसणे हे हास्यास्पद आहे. तसेच, शिवसेनेच्या नावावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी केलेला व्यवहार हा अनैतिक होता, अशी टीकाही राम नाईक यांनी केली आहे. ते आटपाडी येथे बोलत होते.
शरद पवारांवर टीका : भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यपाल राम नाईक यांनी उद्धव ठाकरेंच्यासह शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. आटपाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, आपल्याला राष्ट्रपतीपदावर जाण्याची इच्छा नाही, या पदावर सतर्कता हवी असते, मी राज्यपाल होतो उत्तर प्रदेशचा. तसेच, राज्यपाल पदावरच्या माणसाला स्वतःचे निर्णय घ्यायचे असतात, असे मत व्यक्त केले.
उद्धव ठाकरेंनी केला अनैतिक व्यवहार : तर राज्यातील आघाडी सरकार स्थापनाबाबत बोलताना राम नाईक म्हणाले, विधानसभा निवडणुकीत निवडणुका वेळी भाजप-शिवसेना एकत्र गेली होती. पण, केवळ मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नावावर कायदेशीर पण अनैतिक व्यवहार केला. आज जी युती झाली, त्यावर निवडणुकीची भाषा केली जात आहे. मग त्यावेळी तुम्ही लोकांच्याकडे का गेला नाही, असा सवालही नाईक यांनी केला आहे.
शिवसेना नेत्यांची घुसमट : तसेच अडीच वर्षांत तुमच्या लोकांचा व्यवहार मान्य झाला नाही. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची इतकी घुसमट होत होती की, त्याना औरंगाबादचे संभाजीनगर करता आले नाही. तसेच, शिवसेनेत नेत्यांची घुसमट इतकी मोठी होती की, आगीने लोक मरतात आणि धुराणे पण मारतात.
औरंगाबादचे नामांतरण : औरंगाबाद शहर नामांतर मुद्द्यांवर बोलताना राम नाईक म्हणाले, शरद पवार यांना औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची कल्पना देण्याची गरज नव्हती. राष्ट्रवादीचे अन्य नेते सरकारच्या कॅबिनेटमध्ये होते. त्यांनी शरद पवार यांना या निर्णयाची कल्पना द्यायला हवी होती. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर केले जाणार याची मला कल्पना नव्हती, असे म्हणणे शरद पवार यांना शोभत नाही.
शरद पवारांचे मार्गदर्शन नाही : महाविकास आघाडीला मार्गदर्शक म्हणून शरद पवार यांचे नाव घेतले जात होते. मग मार्गदर्शन करणाऱ्याला हे सारे निर्णय घेतले जाणार हे माहिती नव्हते म्हणणे म्हणजे तुम्ही महाविकास आघाडी सरकारला योग्य मार्गदर्शन करीत नव्हते हे सिद्ध झाले आहे, असे मत राम नाईक यांनी केले.
राज्यपालांवरील आरोप चुकीचे : विधानसभेचा अध्यक्ष तुम्ही निवडू शकत नाही आणि राज्यपालांवर महाविकास आघाडी कशी, काय आरोप करते. त्याचबरोबर शिवसेनेतला उद्रेक हा एका दिवसातला शिवसेनेच्या नेत्याचा उद्रेक नव्हता. तर संजय राऊत यांची भाषा म्हणजे स्वतःला आणि दुसऱ्याला खड्यात घालणे अशी होती. संजय राऊत यांनी बोलताना हीन दर्जाची भाषा वापरली.
हेही वाचा : Sharad Pawar : वसंतरावं नाईक यांच्यामुळे मला आमदारकी लढवता आली - शरद पवार
हेही वाचा : Sanjay Raut on election : महाराष्ट्रात निवडणुका लागतील, ही तात्पुरती व्यवस्था', संजय राऊतांचा दावा