सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत सरकारच्या कारभारावर कवितेतून जोरदार आसूड ओढले. तासगावमध्ये आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी बोलताना कोल्हे यांनी आबांच्या कारकिर्दीचा आढावा कवितेतून घेतला.
आर. आर. पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेतलेले अनेक निर्णय त्यांची कार्यशैली आणि सध्याच्या सत्ताधारी भाजपचा सुरू असलेल्या कारभाराचे वाभाडे खासदार कोल्हे यांनी आपल्या कवितेतून काढले. उपस्थितांनी कवितेला जोरदार दाद दिली.