ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे फुलशेती उत्पादक मेटाकुटीला, दररोज हजारोंचा फटका

author img

By

Published : May 6, 2020, 11:57 AM IST

Updated : May 6, 2020, 1:50 PM IST

शरद जगताप यांनी बँकेकडून कर्ज काढून तीस गुंठ्यात पॉलीहाऊस बनवून जरबेराची फुल शेती बनवली होती. परंतु, लॉकडाऊनमुळे बँकेचे हप्ते भरणे कठिण झाले असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी या शेतकऱ्याची फुलशेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राज्य शासनाने या फुल शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लॉकडाऊनमुळे फुलशेती उत्पादक मेटाकुटीला, दररोज हजारोंचा फटका
लॉकडाऊन मुळे फुल शेती उत्पादक मेटाकुटीला रोज हजारोंचे नुकसान.

सांगली - लॉकडाऊनमुळे फुल उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असून दररोज फुल शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या नुकसानीतही फुल उत्पादक आपली फुलशेती जगवण्याची धडपड करत आहेत. रोज या शेतकऱ्याला हजारो फुलं फेकून द्यावी लागत आहेत. यामुळे राज्य सरकारने या फुल उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेऊन त्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

लॉकडाऊनमुळे फुलशेती उत्पादक मेटाकुटीला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना दररोज शेतीमध्ये नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वाळवा तालुक्यातील वशी येथील शरद जगताप हे फुल उत्पादक शेतकरी असून ते जरबेरा जातीचे लाल पांढर्‍या पिवळ्या रंगाच्या फुलांचे उत्पादक घेत आसतात. ही फुलं मुंबई व इतर ठिकाणी पाठवली जात असतात. मात्रस, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हा फुलांचा व्यवसाय ठप्प झाला होता. वाहतूक बंद असल्याने फुलांना मागणी होत नव्हती. मात्र, या परिस्थिती मध्येही शरद जगताप हे आपली फुलशेती जगविण्याचे काम करत होते. त्यातच दररोज चार हजार फुले तोडून फेकून द्यावी लागत होती. अशात फुलशेतीला जगवण्यासाठी दररोज हजारो रुपयांची महागडी औषधे देऊन त्यांना जगवत असून त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या त्यांना महिन्याकाठी ७ ते ८ लाखांचे नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे या शेतकऱ्याला बँकेचे हप्ते भरणे कठीण होऊन बसले आहे. यामुळे सध्या फुलशेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

शरद जगताप यांनी बँकेकडून कर्ज काढून तीस गुंठ्यात पॉलीहाऊस बनवून जरबेराची फुल शेती बनवली होती. परंतु, लॉकडाऊनमुळे बँकेचे हप्ते भरणे कठिण झाले असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी या शेतकऱ्याची फुलशेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राज्य शासनाने या फुल शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सध्या युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उत्तम शेती करणे गरजेचे आहे, तरच शेती टिकेल. यासाठी शासन स्तरावर शेतीसाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. याचाच विचार करून वशी येथील शरद सदाशिव जगताप यांनी प्रिंटिंग डिप्लोमा केला असून नायजेरिया येथे पाच वर्ष ते नोकरी करत होते. मात्र, शेतीची ओढ असल्याने दोन वर्षांपूर्वी गावी येऊन तीस गुंठ्यात पन्नास लाख रुपये खर्च करून पॉलीहाऊसमध्ये जरबेरा फुलांच्या रोपांची लागण केली. यामध्ये त्यांची पत्नी विद्या जगताप ह्या एमबीए असूनही त्यांनी पुणे येथील नोकरी सोडून पती बरोबर शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी तयारी दाखवली. या कुटुंबाने कोणतीही तमा न बाळगता शेतामध्ये कष्ट करून उत्तम प्रतीचा जरबेरा फुलवला.

पहिल्या वर्षी त्यांना यातून 10 लाखाचे उत्पन्न मिळाले. सध्या लग्नसराई सुरू असल्याने फुलांना चांगल्या प्रकारे मागणी होती. मात्र, कोरोनाच्या महामारीने संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. यामुळे लग्नसमारंभ, मार्केट व वाहतूक बंद झाल्याने फुलांची मागणी बंद झाली आणि पर्यायाने रोज जवळपास ४ हजार फुले तोडून टाकावी लागत आहेत. फुलांची दुसऱ्या टप्प्यात उत्पादन क्षमता जास्त असते. यामुळे चालू वर्षी फुलांच्या उत्पनात वाढ होऊन प्रति फुलास ७ रुपये दर मिळाला असता. यामुळे महिन्याला ८ ते ९ लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊन सुरू झाले आणि फुलांची वाहतूक बंद असल्याने मार्केट बंद झाली. यामुळे रोज ४ हजार फुले तोडून टाकावी लागत आहेत. शिवाय रोपे जगवण्यासाठी दररोज १ हजार ५०० रुपयांचे औषध व लागवड लागते. यामुळे महिन्याला औषधांसाठी ४० ते ४५ हजार रुपये लागत आहेत. फुलांची मागणी नसल्याने फुलेही तोडून टाकावी लागत असून प्रत्येक महिन्याला ७ ते ८ लाखांचे नुकसान होत आहे. असे नुकसान गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे.

सध्या नफा नसला तरी रोपांची जपणूक करणे महत्वाचे आहे. यामुळे हा खर्च परवडणारा नसल्याने मजुरांना न घेता स्वतः पती-पत्नी व भाऊ अर्जुन जगताप, वाहिनी वनश्री जगताप लहान मुले अभिजित व मधुरा हे सर्वजण दिवसभर राबत असतात. फुलांबरोबर शरद यांनी द्राक्ष बागही केली होती. त्यापासूनही मोठा फायदा होईल, असे वाटत असताना लॉकडाऊनमुळे द्राक्षांनाही दर मिळाला नाही, तीही बाग तोट्यात गेली. यामुळे पॉलीहाऊससाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थांबले आहेत. तर, राज्य शासनाकडून फुल उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे.

Last Updated : May 6, 2020, 1:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.