ETV Bharat / state

सांगलीत कृष्णेची पाणीपातळी पोहचली 35 फुटांवर; नदीकाठच्या सखल भागात शिरले पाणी - आपत्कालीन परिस्थिती

मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीला पूर आला आहे. तसेच वाढलेल्या पाणी पातळीमुळे शहरातील नदीकाठच्या भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे 15 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

नदीकाठच्या सखल भागात शिरले पुराचे पाणी
author img

By

Published : Jul 31, 2019, 10:32 AM IST

Updated : Jul 31, 2019, 11:24 AM IST

सांगली - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीला पूर आला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी तब्बल 35 फुटांवर पोहचली आहे. तसेच वाढलेल्या पाणी पातळीमुळे शहरातील नदीकाठच्या भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे 15 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

सांगलीत कृष्णेला पाणीपातळी पोहचली 35 फुटांवर

पाणीपातळी वाढल्याने कर्नाळ रोड, दत्तनगर आणि सूर्यवंशी प्लॉट या भागात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचे महापालिका शाळा नंबर २५ मध्ये स्थलांतर सुरू आहे. तसेच नदीकाठी असणाऱ्या दत्तनगर भागातील नागरिकांना सर्तकच्या सूचना देण्यात आल्या आहे. मध्यरात्रीपासून सांगली महापालिका यंत्रणा आणि अग्निशमन विभाग आणि आपत्ती नियंत्रण कक्ष पूर असलेल्या भागात मदतकार्यामध्ये सक्रिय आहे. त्याचप्रमाणे ज्या भागात पुराचे पाणी येत आहे तेथील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. शिवाय आपत्कालीन परिस्थिती नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पाणीपातळी वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे यासाठी महापालिका यंत्रणा मदत करेल असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. पुराचे पाण्यामुळे शहरातील नांद्रे -पलूस मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नांद्रे-पलूस मार्ग बंद झाला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Av

Feed send file name - mh_sng_01_krushna_nadi_pur_vis_01_7203751 -
mh_sng_01_krushna_nadi_pur_vis_01_7203751

स्लग - सांगलीत कृष्णेला पूर,पाणी पातळी पोहचली 35 फुटांवर,शहरातील नदीकाठच्या सखल भागात शिरले पुराचे पाणी..

अँकर - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीला पूर आला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी 35 फुटावर पोहचली आहे.तर वाढलेल्या पाणी पातळीमुळे शहरतील नदी काठच्या भागात पाणी घुसले आहे.त्यामुळे 15 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.तर शहरातील जुना
नांद्रे-पलूस मार्ग पाण्यामुळे बंद झाला आहे.Body:व्ही वो - तीन दिवसांपासून कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीला पूर आला आहे.कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने सांगलीतील कृष्णाची पातळी 35 फुटांवर पोचली आहे.त्यामुळे कर्नाळ रोड, दत्तनगर , सूर्यवंशी प्लाँट, भागात पुराचे पाणी शिरले आहे. याचबरोबर सूर्यवंशी प्लाँटमधील नागरीकांचे महापालिका शाळा नंबर २५ मध्ये स्थलांतर सुरू आहे. नदी काठी असणाऱ्या दत्तनगर भागातील नागरीकांना सर्तकच्या सुचना देण्यात आल्या असून मध्यरात्री पासून सांगली महापालिका यंत्रणा आणि अग्निशमन विभाग, आपत्ती नियंत्रण कक्ष पूर भागात मदतकार्यात सक्रिय आहे. ज्या भागात पाणी येत आहे तेथील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हालवण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये निवारा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.पाणी पातळी वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे यासाठी महापालिका यंत्रणा मदत करेल असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. तर पुराचे पाण्यामुळे शहरातील नांद्रे -पलूस मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे जुना मार्ग बंद झाला आहे.Conclusion:
Last Updated : Jul 31, 2019, 11:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.