सांगली - शहरातील एका जुन्या फर्निचर व भंगार दुकानाला भीषण ( Fire Furniture and Scrap Shop ) आग लागली. जुन्या कुपवाड रोडवरील असणाऱ्या दुकानाला अचानकपणे आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. तसेच शेजारी असणाऱ्या तीन घरांनाही या आगीची झळ बसली आहे. मात्र ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. शर्थीचे प्रयत्न करत अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
प्रतिक्रिया देताना अग्निशमन अधिकारी आणि नुकसानग्रस्त जुन्या फर्निचर दुकानाला आग : सांगली शहरातल्या जुना कुपवाड रोडवरील मंगळवार बाजार नजीक असणाऱ्या एका जुन्या फर्निचर व भंगार दुकानाला दुपारच्या सुमारास अचानक पणे आग लागली. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जुने लाकडी फर्निचर व इतर साहित्य असल्याने आगीने भीषण रूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. ज्यामुळे याची झळ शेजारच्या तीन घरांना देखील बसली. अखेर शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या भीषण आगीत फर्निचर दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य त्याचबरोबर तीन कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
हेही वाचा - VIDEO : भरउन्हात पाण्यासाठी हरणांची भटकंती; ममदापूर वनक्षेत्रातील पाणवठे झाले कोरडेठाक