ETV Bharat / state

सांगली : शासकीय रुग्णालयांची अग्निरोधक यंत्रणा रामभरोसे

जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांची आगीच्या तडाख्यापासून बचाव करणारी यंत्रणा रामभरोसे आहे. गेल्या दोन वर्षांपासून अग्नीरोधक तपासणी (फायर ऑडिट) होऊन तयार झालेला प्रस्ताव सरकार दरबारी धूळ खात पडून आहे. त्यामुळे दुर्दैवाने एखाद्या आगीची घटना घडल्यास रुग्णालयातील अनेकांच्या जिवावर बेतल्यास राहणार नाही, हे निश्चित.

सांगली
author img

By

Published : Jan 12, 2021, 5:37 PM IST

सांगली - सांगली, मिरज शासकीय रुग्णालयाबरोबर जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांची आगीच्या तडाख्यापासून बचाव करणारी यंत्रणा रामभरोसे आहे. गेल्या दोन वर्षांपासून अग्नीरोधक तपासणी (फायर ऑडिट) होऊन तयार झालेला प्रस्ताव सरकार दरबारी धूळ खात पडून आहे. त्यामुळे दुर्दैवाने एखाद्या आगीची घटना घडल्यास रुग्णालयातील अनेकांच्या जिवावर बेतल्यास राहणार नाही, हे निश्चित. पाहुयात सांगलीच्या शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील अग्निरोधक नियंत्रण यंत्रणेचा खेळखंडोबा.

शासकीय रुग्णालयाची आग विरोधी यंत्रणा रामभरोसे..भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात आग लागून घडलेल्या दुर्घटनेमध्ये बालकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यानंतर राज्यातील विविध शासकीय रुग्णालयातील अग्नीरोधक यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा शासकीय रुग्णालय वगळता सांगली आणि मिरज येथील मुख्य शासकीय रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामधील आग विरोधी यंत्रणा रामभरोसे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अग्नीरोधक तपासणी होऊन दोन वर्षे..सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयांची अग्नीरोधक तपासणी होऊन त्याचे प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी धूळ खात पडून आहेत. सांगली शहरातील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय हे सर्वात जुने आणि मोठे रुग्णालय समजले जाते. पश्चिम महाराष्ट्रासह विविध ठिकाणांहून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी याठिकाणी येतात. 390 खाटांची क्षमता या रुग्णालयाची आहे. मात्र, या रुग्णालयातील आग विरोधी यंत्रणा सुसज्ज नसल्याचे आता समोर आले आहे.शासन दरबारी प्रस्ताव धूळ खात पडून..

या रुग्णालयाचे 30 डिसेंबर 2018 रोजी अग्नीरोधक तपासणी होऊन तब्बल 1 कोटी 70 लाख 38 हजार रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, काही त्रुटी निर्माण झाल्याने तो प्रस्ताव पुन्हा शासनाकडून मागवण्यात आला आणि 24 ऑक्टोंबर 2019 रोजी पुन्हा पाठवण्यात आला. मात्र, आद्यप हा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झालेला नाही किंवा तो बासनात गुंडाळून ठेवला आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात अग्निरोधक असणारे स्प्रिंकलर, पाण्याची व्यवस्था, धूर शोधक यंत्रणा ज्या महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना 2006 कायद्यानुसार रुग्णलायांमध्ये असणे गरजेच्या आहेत. मात्र, त्या रुग्णालयात अस्तित्वात असल्याचे दिसून येत नाही. सांगलीप्रमाणे मिरजेच्या शासकीय रुग्णालयाची स्थिती आहे. या रुग्णालयात अग्नीरोधक तपासणी होऊन दोन वर्ष उलटली आहेत. त्या ठिकाणी अग्निरोधक व्यवस्था निर्माण करण्यासाठी एक कोटी 77 लाख 37 हजार रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे.

प्रस्ताव सादर, लवकरच मंजुरी..

याबाबत सांगली शासकीय रुग्णालया प्रशासनाशी संपर्क साधला असता, रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव म्हणाले, सांगली आणि मिरज या दोन्ही शासकीय रुग्णालयांचे अग्नीरोधक तपासणी करून त्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत. सांगली रुग्णालयाचा 24 ऑक्टोंबर 2019 फेर प्रस्ताव तर मिरज शासकीय रुग्णालयाचा 2018 मध्ये पाठवण्यात आलेले आहेत. शासनाकडून ते मंजूर करण्याबाबत सकारात्मक भूमिका आहे. या शिवाय दोन्ही रुग्णालयात विद्युत उपकरणे ज्या ठिकाणी आहेत, त्यासर्व विभागात रोज नियमित तपासणी केली जाते. तसेच अग्नीरोधक सिलेंडर ठेवण्यात आले आहेत, त्याचे वेळोवेळी तपासणी केली जात असल्याचे डॉ. गुरव यांनी सांगितले आहे.

अग्निरोधक यंत्रणा नाही अस्तित्वात..

सांगली महापालिका अग्निशमन विभागाचे अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्याशी जिल्ह्यातील अग्नीरोधक तपासणीबाबत विचारले असता, कोरोना काळात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या सूचनेनुसार अग्नीरोधक तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये शिराळा रुग्णालय वगळता कोठेही अग्नीरोधक तपासणीनंतरच्या उपयोजना करण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये सांगली आणि मिरजेच्या शासकीय रुग्णालयाचा समावेश आहे. याठिकाणी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजन 2006 कायद्यानुसार कोणत्याही उपाययोजना नसल्याचे आढळून आले आहे. तसा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. शिवाय सांगली शासकीय रुग्णालयात जे अग्नीरोधक म्हणून सिलेंडर बसवले आहेत, त्याची परवानगी पालिकेकडून घेणे गरजेचे असते, ती सुद्धा रुग्णालयाकडून घेण्यात आली नसल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.

दुर्घटना घडल्यास जीवितहानी!

एकूणच भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सांगली आणि मिरज सारखे तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रुग्णालयांमध्ये आग विरोधी यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे आगीची एखादी दुर्घटना घडल्यास मोठ्या जीवितहानीला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.