ETV Bharat / state

Farmers suffer : स्टोन क्रशर प्रदूषणामुळे त्रस्त झाले शेतकरी; प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांचे धरले पाय - स्टोन क्रशर प्रदूषणामुळे झाले शेतकरी त्रस्त

कामगार मंत्री सुरेश खाडे ( Labor Minister Suresh Khade ) व त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या पुत्रांकडून उभारण्यात आलेल्या कारखान्याच्या धूळ प्रदर्शनामुळे मिरज तालुक्यातील भोसे इथल्या शेतकऱ्यांचे शेती उध्वस्त होत आहे. धूळ प्रदूषण बाबत तात्काळ अहवाल तयार करून कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Farmers suffer
प्रदूषण अधिकाऱ्यांचे धरले पाय
author img

By

Published : Nov 23, 2022, 11:41 AM IST

सांगली : कामगार मंत्री सुरेश खाडे ( Labor Minister Suresh Khade ) व त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या पुत्रांकडून उभारण्यात आलेल्या कारखान्याच्या धूळ प्रदर्शनामुळे मिरज तालुक्यातील भोसे इथल्या शेतकऱ्यांचे शेती उध्वस्त होत आहे. या बाबतची बातमी प्रसारित करताच प्रदूषण महामंडळाकडून याची दखल (Notice of this from Pollution Corporation ) घेण्यात आली आहे. यावेळी पाहणीसाठी पोहोचलेल्या प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे पाय धरत शेतकऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले. तर धूळ प्रदूषण बाबत तात्काळ अहवाल तयार करून कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रदूषण महामंडळाकडून गंभीर दाखल : मिरज तालुक्यातल्या भोसे या ठिकाणी कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे व त्यांचे स्वीय सहाय्यक मोहन वानखंडे यांच्या मुलांनी भागीदारी मधून स्टोन क्रशर कारखाना उभा केला आहे. या कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धुळीचा प्रदूषण होत आहे. त्याचा परिणाम हा आसपासच्या 85 एकर शेतीवर होत असल्याने इथल्या शेतकऱ्यांची शेती संकटात सापडली आहे. द्राक्ष बाग शेती धूळ प्रदूषणामुळे शेतकऱ्यांना तोडून टाकावी लागत आहे. याबाबतची बातमी प्रसारित करताच प्रदूषण महामंडळाकडून गंभीर दाखल घेण्यात आली. त्यानंतर पाहण्यासाठी भोसे येथील जाधव वस्तीवर प्रदूषण महामंडळ अधिकारी नवनाथ अवताडे पोहोचले असता पीडित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचे थेट पाय धरत रडून आपल्या व्यथा मांडल्या.

मंत्री पुत्राच्या स्टोन क्रशर प्रदूषणामुळे झाले शेतकरी त्रस्त

कार्यवाहीसाठी वरीष्ठ कार्यालयाकडे अहवाल : धुळीमुळे शेती उध्वस्त झाली असून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे शेतकऱ्यांनी हात जोडून आणि रडून अधिकाऱ्यांच्या समोर आपले गाराणे मांडले. यावेळी प्रदूषण महामंडळ अधिकारी नवनाथ अवताडे यांनी आपल्या पथकासह परिसराची पाहणी केल्यानंतर बोलताना, या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे आणि तात्काळ या ठिकाणी पाहणी करण्यात आली असून लवकरचं याबाबतचा अहवाल तयार करून सदर स्टोन क्रशर कंपनीकडून नियम अटी शर्तींचा भंग झाला आहे का ? याबाबतही तपासणी करून त्या दृष्टीने अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी वरीष्ठ कार्यालयाकडे तात्काळ पाठवण्यात येईल,असे स्पष्ट केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.