सांगली- ऐतवडे खुर्द येथील एका शेतकऱ्याने कर्जाबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २३ मे रोजी दुपारी १ ते २ च्या सुमारास उघकीस आली. बाबासो पांडुरंग पाटील (वय.४६) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
बाबासो पाटील यांनी दि.२३ डिसेंबर रोजी दुपारी १ ते २ च्या दरम्यान बळवंत मळ्यातील आपल्या शेतातील जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी फिर्याद त्यांचे चुलत भाऊ संभाजी यशवंत पाटील यांनी कुरळप पोलीस ठाण्यात दिली आहे. बाबासो पाटील यांनी वडिलांच्या नावे बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र घेतलेले कर्ज वेळेत परत न करता आल्याने पाटील बरेच दिवसापासून तणावात होते. कर्ज न फेडता आल्याच्या विवचनेत पाटील यांनी आत्महत्या केल्याची गावात चर्चा आहे. घटनेचा पुढील तपास स.पो.नि. अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. रेखा सूर्यवंशी करत आहेत.
हही वाचा- कर भरा अन् सोन्याचे दागिने बक्षीस मिळावा, 'या' गावात राबवली जाते योजना