सांगली - राज्यभर चर्चेचा विषय ठरलेला १६ लाखांचा मोदी बकरा सांगली जिल्ह्यातील आटपाटी येथून चोरीला गेला आहे. हा बकरा चोरुन नेण्यासाठी एका अलिशान कारचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी आटपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या १६ लाखांचा बकरा चर्चेचा विषय ठरला होता. त्याला आटपाडीच्या बाजारात ७० लाख रुपये इतक्या दराने मागणी झाली. पण तो मालकाने विकला नाही. मात्र, त्यातील १६ लाखांचा बकरा आटपाडीच्या सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला.
उच्चांकी दरामुळे मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेला लहान बकरा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात प्रसिद्ध झाले होते. आता सोमनाथ यांनी १६ लाख रुपये देऊन विकत घेतलेला तो बकरा चोरीला गेला आहे. चोरट्यांनी शनिवारी पहाटे गोठ्यात शिरून त्या बकऱ्याला पळवलं आहे. विशेष म्हणजे, या बकऱ्याची चोरी करण्यासाठी अलिशान कारचा वापर करण्यात आला. या घटनेने आटपाडी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - टाटाचा अहवाल वेळ काढूपणा; धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा भाजपावर निशाणा..
हेही वाचा - पोलिसांनी रोखली भाजपाच्या किसान आत्मनिर्भर यात्रेच्या विरोधातील स्वाभिमानीची कडकनाथ संघर्ष यात्रा