ETV Bharat / state

धनगर युवा नेते गोपीचंद पडळकर यांची सिनेसृष्टीत एंट्री..

भाजपचे बंडखोर व धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर 'धुमस' या मराठी चित्रपटातून चंदेरी दुनियात करणार प्रवेश. राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या.

author img

By

Published : Feb 12, 2019, 8:34 AM IST

Gopichand Padalkar

सांगली - धनगर समाजातील तरुण नेतृत्व आणि राजकारणातील बहुचर्चित चेहरा आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. भाजपचे बंडखोर व धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर 'धुमस' या मराठी चित्रपटातून चंदेरी दुनियात प्रवेश करत आहेत. त्यांच्या सिनेक्षेत्रातील एंट्रीने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दक्षिणेत सिनेसृष्टी आणि राजकारण हे समीकरण नवं नाही. सिनेसृष्टीचा राजकारणात चांगला फायदा होतो, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे अनेक दिग्गज स्टार कलाकार राजकारणात नशीब आजमावतात. मात्र, राज्याच्या राजकीय पटलावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ते 'धुमस' या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. हा चित्रपट १५ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या कथानकावर आधारित हा चित्रपट असून यामध्ये गोपीचंद हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दक्षिणेतील डी. गोवर्धन यांनी केले आहे. तर साक्षी चौधरी ही या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत आहे. तर चित्रपटाचे कथानक, गीते आणि निर्मिती हे स्वतः गोपीचंद पडळकर व उत्तम जानकर या दोघांनी केले आहे. दक्षिणात्य स्टाईलच्या धर्तीवर या चित्रपटाची निर्माती करण्यात आले आहे. गीत, फाईट आणि डान्स क्षमतेने वापर करण्यात आला आहे.

undefined

गोपीचंद पडळकर यांच्या या चित्रपटातील गाण्याचे ट्रेलर प्रसिद्ध झाले आहे. मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच साऊथच्या स्टाईलचा प्रयोग या चित्रपटात करण्यात आला आहे. मात्र, यापेक्षा वेगळा प्रयोग म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी राजकारणातून थेट चंदेरी दुनियेत घेतलेली उडी. कारण गोपीचंद पडळकर हे जिल्ह्यातील भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून सर्वपरिचित झाले आहेत. धनगर आरक्षणसाठी पडळकर यांनी उभरलेले आंदोलन यामुळे धनगर समाजाच्या गळ्यातील ताईत बनलेले. गोपीचंद हे आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार म्हणून सध्या चर्चेत आहेत. तर धनगर आरक्षण लढ्याच्या माध्यमातून हार्दिक पटेल यांना सांगलीमध्ये आणून राज्यातील सर्वच राजकारण्यांना मोठा धक्का दिला होता. त्याच्या राजकारणातुन थेट सिनेसृष्टीत केलेल्या एंट्रीमुळे पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना तर धक्का बसला आहे. शिवाय जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Intro:सरफराज सनदी - सांगली

File name - R_MH_1_SNG_12_FEB_2019_GOPICHAND_IN_MOVIE_SARFARAJ_SANADI - To - R_MH_3_SNG_12_FEB_2019_GOPICHAND_IN_MOVIE_SARFARAJ_SANADI

स्लग - राजकीय पटलावरील बहुचर्चित चेहरा झळकणार रूपेरी पडद्यावर,
गोपीचंद पडळकर यांची सिनेसृष्टीत एंट्री..

अँकर - सांगलीच्या राजकारणातील बहुचर्चित चेहरा आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.भाजपाचे बंडखोर व धनगर आरक्षणाचे नेते गोपीचंद पडळकर 'धुमस'या मराठी चित्रपटातुन चंदेरी दुनियात प्रवेश करत आहेत.त्यांच्या सिनेक्षेत्रातील एंट्रीने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. Body:
व्ही वो - दक्षिणेत सिनेसृष्टी आणि राजकारण हे समीकरण नवं नाही.आणि राजकारणात याचा चांगला फायदा होतो हे सर्वज्ञात आहे.त्यामुळे अनेक दिग्गज स्टार कलाकार सध्या अनेक पक्षात दाखल तर स्वतःचा पक्ष काढून राजकारणात आपला राबता ठेवून आहेत.मात्र सांगली जिल्ह्यातील या उलटा चित्र सध्या पाहायला मिळत आहे.सांगली जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे भाजपाचे बंडखोर आणि धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.जिल्ह्याच्या राजकारणातील एक बहुचर्चित नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.आणि आता ते चंदेरी दुनियात दाखल झाले असून धुमस या मराठी चित्रपटातुन रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.१५ मार्च रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार आहे.महाराष्ट्रातील प्रस्थापित
राजकीय व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या कथानकावर आधीरत हा चित्रपट असून यामध्ये गोपीचंद पडळकर हे मुख्य भूमिकेत आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दक्षिणेतील डी गोवर्धन यांनी केले आहे.तर साक्षी चौधरी ही या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत आहे.तर याचे कथानक,गीते आणि निर्मिती हे स्वतः गोपीचंद पडळकर व उत्तम जानकर या दोघांनी केले आहे.दक्षिणात्य स्टाईलच्या धर्तीवर या चित्रपटाची निर्माती करण्यात आले आहे.गीत,फाईट आणि डान्स क्षमतेने वापर करण्यात आला आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या या चित्रपटातील गाण्याचे ट्रेलर प्रसिद्ध झाले आहे.मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाचं साऊथच्या स्टाईलचा प्रयोग या चित्रपटात करण्यात आला आहे.मात्र यापेक्षा वेगळा प्रयोग म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी राजकारणातून थेट चंदेरी दुनियेत घेतलेली उडी.कारण गोपीचंद पडळकर हे जिल्ह्यातील भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून सर्वपरिचित झाले आहेत.त्याचा बरोबर धनगर आरक्षण साठी पडळकर यांनी उभरलेले आंदोलन यामुळे धनगर समाजाच्या गळ्यातील ताईत बनलेले गोपीचंद पडळकर हे आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार म्हणून सध्या चर्चेत आहेत.तर धनगर आरक्षण लढ्याच्या माध्यमातून हार्दिक पटेल यांना सांगली मध्ये आणून राज्यातील सर्वच राजकारण्यांना मोठा धक्का दिला होता.आणि अश्याच पध्दतीने राजकारणातुन थेट सिनेसृष्टीत केलेल्या एंट्रीमुळे पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना तर धक्का बसला आहे.शिवाय जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चित्रपट गाण्याची ट्रेलर लिंक .
https://youtu.be/IKvyKcXp3ssConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.