ETV Bharat / state

Deputy Chief Minister Ajit Pawar : राजकीय स्वार्थासाठी राज्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न दुर्दैवी - अजित पवार - sangli latest news

ती पहाट असेल तर धन्यचं. काही लोक माथी भडकवून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थासाठी राज्यात धार्मिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत, तसेच हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची खंत ही व्यक्त केली आहे.अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी केली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : May 15, 2022, 10:21 PM IST

सांगली: काही लोक माथी भडकवून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थासाठी राज्यात धार्मिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची खंत ही व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पहाटेच्या शपथविधी वरून होणाऱ्याला टीकेला उत्तर देताना, म्हणाले सकाळी 8 म्हणजे पतुमची पहाट असेल, तर धन्यचं अशा शब्दात विरोधकांना ( Ajit Pawar Statement ) फटकारले. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजकीय स्वार्थासाठी राज्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न दुर्दैवी - अजित पवार

राजकीय स्वार्थासाठी धार्मिक मुद्दे -

यावेळी अजित पवार म्हणाले, जे काय सध्या महाराष्ट्रात चाललय ते पटत नाही. आज खऱ्या अर्थाने प्रश्न आहे, तो महागाईचा. पण काही लोक माथी भडकवायच काम करत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.हे चुकीचं आहे. मुख्यमंत्री सुद्धा आजपर्यंत शांत होते. पण काही लोक राजकीय स्वार्थासाठी भोंगे, हनुमान चालीसा असे धार्मिक मुद्दे करत आहेत. पण काही व्यक्ती विकृतपणे बोलत असतील, तर विनाश काली विपरीत बुद्धी असे एका वाक्यात म्हणावे लागेल. संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे, म्हणून काही ही बोलावे हे योग्य नाही. त्यामुळे राज्यातील वातावरण खराब होणार असेल, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शरद पवारांचे 60 वर्षाची कारकीर्द ( Sharad Pawar 60 year career ) आहे, पण त्यांनी कधी कमरेच्या खालची टीका, आरोप कोणावर केला नाही.

त्यांची पहाट 8 वाजता असेल तर धन्य -

मुख्यमंत्री बोलले नसते, तर चुकीचा अर्थ काढला असता. त्यामुळे ते 14 तारखेला बोलणार होते, त्यांनी भूमिका मांडली. पण मला मुख्यमंत्री काय बोलले यात अजिबात इंटरेस्ट नाही, आपण विकासाचं बोलू. तसेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेमधून पहाटेच्या शपथविधीचा केलेला उल्लेख आणि विरोधकांच्याकडून सातत्याने होणाऱ्या पहाटेच्या शपथ विधीच्या उल्लेखावरून बोलताना, आपण त्या वेळीच काही गोष्टी बोललो आहे, आणि ज्या वेळी आपल्याला वाटेल, त्यावेळी त्या सर्व गोष्टी बोलू, आता ती वेळ नाही. पण काही लोकं पहाटे पहाटे असं सारखं सांगतात, मला वाटत आठ वाजता त्यांच्यासाठी पहाट असेल, तर ते धन्यचं, अशा शब्दात हात जोडत अजित पवारांनी फटकारले.

हेही वाचा - "मदर्स डे" निमित्ताने कवितेतून 'आई'बद्दल रामदास आठवलेंनी व्यक्त केली कृतज्ञता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.