ETV Bharat / state

दुष्काळामुळे शेळ्या-मेंढ्यांवर उपासमारीची वेळ; स्वतंत्र छावण्या सुरू करण्याची मागणी

यंदाच्या भीषण दुष्काळात शेतीला जोडधंदा म्हणून असणारा शेळ्या मेंढ्यांचा व्यवसायही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण दुष्काळामुळे निर्माण झालेली चारा टंचाई आणि उजाड बनलेली माळराने यामुळे शेळया-मेंढ्यांना गवतसुद्धा मिळणे अवघड बनले आहे. दुसऱ्या बाजूला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या गाई, बैल आणि म्हशी यांच्यासाठी चारा छावण्या सरकारकडून सुरू करण्यात येत आहेत. मात्र, शेळ्या-मेंढ्याच्या बाबतीत सरकारकडून विचार झाला नाही. यामुळे चाऱ्या अभावी शेळ्या-मेंढयांवर उपसमारीची वेळ आली आहे.

दुष्काळामुळे शेळ्या-मेंढ्यांवर उपासमारीची वेळ
author img

By

Published : May 20, 2019, 10:23 AM IST

Updated : May 20, 2019, 12:05 PM IST

सांगली - दुष्काळामुळे यंदा जिल्ह्यातील शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चारा टंचाई आणि भकास बनलेले माळरान यामुळे तब्बल ६ लाख ३१ हजार ७९८ शेळ्या-मेंढ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तर या जनावरांबाबत सरकारकडे कोणत्याही उपयोजना नसल्याने हे पशुधन धोक्यात आले आहे.

दुष्काळामुळे शेळ्या-मेंढ्यांवर उपासमारीची वेळ

सांगली दुष्काळी भागातील जत तालुक्‍यासह आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यात सुमारे ६ लाख ३१ हजार ७९८ शेळ्या मेंढ्या आहेत. शेतीसोबत हा जोडधंदा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्यांचे पालन व्यवसाय केला जातो. येथे मोकळे रान अधिक असल्याने मेंढपाळांना पावसाळ्यात चाऱ्याची अजिबात कमतरता पडत नसे. इतर वेळीही चारा उपलब्ध होत असे.

मात्र, यंदाच्या भीषण दुष्काळात शेती बरोबर हा व्यवसायही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण दुष्काळामुळे निर्माण झालेली चारा टंचाई आणि उजाड बनलेली माळराने यामुळे शेळया-मेंढ्यांना गवतसुद्धा मिळणे अवघड बनले आहे. दुसऱ्या बाजूला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या गाई, बैल आणि म्हशी यांच्यासाठी चारा छावण्या सरकारकडून सुरू करण्यात येत आहेत. मात्र, शेळ्या-मेंढ्याच्या बाबतीत सरकारकडून विचार झाला नाही. यामुळे चाऱ्या अभावी शेळ्या-मेंढयांवर उपसमारीची वेळ आली आहे.

अलीकडच्या काही वर्षांत पाऊसमान कमी होत चालल्याने वडिलोपार्जित मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येत आहे. यंदा तर फारच बिकट अवस्था झाली असून चारा-पाणी नसल्याने मेंढ्या कवडीमोल दराने विकण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. त्यामुळे शासनाने या शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याबाबत विचार करून त्यांच्यासाठी वेगळ्या छावण्या सुरू करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Av -

Feed send file name - R_MH_1_SNG_14_MAY_2019_CHARA_TANCHAI_ON_SHELYA_MENDHYA_SARFRAJ_SANADI.

स्लग - दुष्काळाने शेळ्या-मेंढ्यांवर उपासमार,सरकारकडे नाही कोणत्याचा उपयोजना..

अँकर - दुष्काळामुळे यंदा सांगली जिल्ह्यातील शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.चारा टंचाई आणि भकास बनलेले माळरान यामुळे तब्बल ६ लाख ३१ हजार ७९८ शेळ्या मेंढ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तर या जनावरांबाबत सरकारकडे कोणत्याही उपयोजना नसल्याने हे पशुधन धोक्यात आले आहे.Body:सांगली दुष्काळी भागातील आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्या पालन व्यवसाय केला जातो.दुष्काळी शेतकऱ्यांना हा मोठा जोडधंदा आहे.
मात्र यंदाच्या भीषण दुष्काळात शेती बरोबर हा व्यवसायही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.कारण दुष्काळामुळे निर्माण झालेली चारा टंचाई आणि उजाड बनलेली माळराने यामुळे शेळया-मेंढ्यांना गवत सुद्धा मिळणे अवघड बनले आहे.

अलीकडच्या काही वर्षांत पाऊसमान कमी होत,चालल्याने वडिलोपार्जित मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येत आहे. यंदा तर फारच बिकट अवस्था झाली असून,चारा-पाणी नसल्याने मेंढ्या कवडीमोल दराने विकण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे.त्यामुळे सततच्या दुष्काळाने मेंढपाळ खचत चालला आहे.शेळ्या-मेंढ्यांसाठी स्वतंत्र चारा छावण्या सुरू कराव्यात,अशी मागणी आहे.

जत तालुक्‍यासह आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यात सुमारे ६ लाख ३१ हजार ७९८ शेळ्या मेंढ्या आहेत.मेंढीपालन हा व्यवसाय आहे.मोकळे रान अधिक असल्याने मेंढपाळांना पावसाळ्यात चाऱ्याची अजिबात कमतरता पडत नसे.इतर वेळीही चारा उपलब्ध होत असे,मात्र यावेळी दुष्काळाची तीव्रता वाढली आहे.यामुळे या जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

दुसऱ्या बाजूला दुष्काळग्रस्त शेतकरयांच्या गाई,बैल आणि म्हशी यांच्यासाठी चारा छावण्या सरकारकडून सुरू करण्यात येत आहेत.मात्र शेळ्या-मेंढ्याच्या बाबतीत सरकारकडून विचार झाला नाही.यामुळे चाऱ्या अभावी शेळ्या-मेंढयांवर उपसमारीची वेळ आली आहे.तर काही मेंढपाळ हे मिळेल त्या किंमतीत शेळ्या-मेंढ्या विकत आहेत.

त्यामुळे शासनाने या शेळ्या - मेंढ्यांच्या चाऱ्याबाबत विचार करून यांच्यासाठी पण छावण्या सुरू केल्यास हे गोरगरीब शेतकरी आणि मेंढपाळांचे पशुधन चाऱ्याअभावी धोक्यात येणार आहे. Conclusion:
Last Updated : May 20, 2019, 12:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.