ETV Bharat / state

Sangli News: आई-वडिलांचा शोध राहिला अपूर्ण; पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू - दिनेश देशमाने

पाचव्या मजल्यावरून पडून एका चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मिरजमधील झारीबाग परिसरात घडली आहे. यशवी दीनेश देशमाने (वय 4 वर्षे) असे या मृत बलिकेचे नाव आहे. जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Sangli News
चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
author img

By

Published : Feb 8, 2023, 10:51 AM IST

सांगली : मिरज शहरातील झारीबाग येथील बुधगावकर मळा येथे मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यशवी देशमाने हिचे वडील हे डॉक्टर आहे. ते निर्मिती टॉवर इमारतीमधील पाचव्या मजल्यावर राहतात. देशमाने यांना दोन मुली आहेत. यापैकी मोठी मुलगी आजारी होती. त्यामुळे देशमाने दांम्पत्य तिला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले होते. याचवेळी त्यांची लहान मुलगी ही झोपली असल्याने त्यांनी तिला घरात ठेवून जाणे पसंत केले. यावेळी घरातून बाहेर पडताना देशमाने दांम्पत्यानी घराला बाहेरुन कुलूप लावले होते.

तोल जावून खाली पडली : आपल्या मोठ्या मुलीला उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर घरात एकटीच असणाऱ्या चार वर्षीय यशवीला काही वेळाने जाग आली. त्यानंतर ती घरात आपल्या पालकांना शोधू लागली. घरात कोणीच नसल्याने घाबरलेल्या यशवीने घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेरून कुलूप असल्याने तो उघडू शकला नाही, मग ती घराच्या गॅलरीमध्ये पोहचली होती. यावेळी गॅलरी मधून तिने कोणी दिसतेय का? हे पाहण्यासाठी गॅलरीतून वाकून पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिचा तोल गेला, ती थेट पाचव्या मजल्यावरून खाली पडली. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

उपचार सुरू असताना यशवीचा मृत्यू : दरम्यान यशवी खाली पडल्याची बाब आसपासच्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर जखमी अवस्थेत असणाऱ्या यशवीला तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना यशवीचा मृत्यू झाला. यशवीच्या मृत्यूनंतर देशमाने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. या घटनेची माहिती मिळताचा देशमाने यांच्या नातेवाईकांना भारती हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती.

'या' चुकीमुळे गमवला जीव : दिनेश देशमाने हे मिरज शहरात डॉक्टर म्हणून काम करतात. मात्र आपल्या मोठ्या मुलीच्या उपचारासाठी त्यांना बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची वेळ आली होती. घरातून बाहेर जाताना आपल्या लहान चार वर्षीय यशवीला घरात झोपलेल्या अवस्थेत सोडले, यावेळी घराला त्यांनी कुलुप लावले. पण गडबडीत त्यांनी गॅलरीचा दरवाजा बंद करणे विसरून गेले, नेमक्या या चुकीमुळे यशवीला आपला जीव गमवावा लागला, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ : सदर घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी पोलीसांनी भारती हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती. त्यानंतर रात्री उशिरा घटनास्थळी दाखल होत, सदर घटनेचा पंचनामा करत या घटनेची नोंद केली आहे. अधिक तपास महात्मा गांधी पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर चार वर्षीय चिमुकली यशवीच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Mumbai Crime : 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराप्रकरणी दोन आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.