सांगली - जत तालुक्यातील बिळूर वज्रवाडासह तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे द्राक्षबागांचे फार मोठ्या प्रमाणात नुसकान झाली आहे. 500 एकरहून अधिक बागांना या पावसाचा फटका बसला आहे. दुष्काळशी दोन हात करून व प्रसंगी टँकर लावून जीवापाड जपलेल्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सोमवारी सकाळी महसूल व कृषी या अधिकाऱ्यांना घेऊन नुसकानग्रस्त भागाची पाहणी केली.
जत तालुक्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपीटीचा तडाखा बसला आहे. यामुळे शेकडो एकरातील द्राक्षबागा जमिनदोस्त झाल्या आहेत. बिंळूर, उमराणी एंकूडी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. द्राक्ष, बेदाणे, रब्बी पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस पडत आहे. त्याचा फटका शेतीला बसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली आहे.