सांगली - सत्ताधारी भाजप समर्थक नगरसेवकाने नागरिकांसमवेत सांगली महापालिकेविरोधात आंदोलन केले आहे. कुपवाड शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरण करण्याच्या मागणीसाठी गाव बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - सांगलीत रस्त्यालगत खोदलेल्या चरीत अडकला रानटी गवा; जेसीबीच्या साहाय्याने सुखरुप सुटका
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विकासासाठी नुकताच शंभर कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र, कुपवाड शहरातून जाणारा मुख्य रस्ता मंजूर असतानाही रस्त्याचे काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजप समर्थक कुपवाडचे अपक्ष नगरसेवक गजानन मगदूम यांनी थेट महापालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे.
हेही वाचा - सांगलीकरांनी साजरा केला आयर्विन पुलाचा 90 वा वाढदिवस
कुपवाड शहरातील मुख्य चौकात मगदूम यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये कुपवाड शहरातील नागरिक तसेच कुपवाड एमआयडीसीतील उद्योजक, व्यापारी यांनी सहभाग घेतला होता. तसेच कुपवाड शहरातल्या व्यापाऱ्यांनीही शहर बंद करून मगदूम यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी कुपवाड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
हेही वाचा - सांगलीत ऊस दर आंदोलनाची ठिणगी, एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक
तर केवळ श्रेयवादाच्या राजकारणातून कुपवाड शहराच्या विकासाला खो घालण्यासाठी काही लोकांकडून रस्त्याचे काम रोखण्यात आल्याचा आरोप यावेळी नगरसेवक प्रशांत मगदूम यांनी केला. तर या आंदोलनाची दखल घेत महापालिकेच्या आयुक्तांनी याठिकाणी कुपवाड शहरातील रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.