सांगली - जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल 241 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक सांगली महापालिका क्षेत्रातील 134 जणांचा समावेश आहे, तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 81 जण कोरोना मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 1 हजार 202 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 307 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी सापडलेले कोरोना रुग्ण -
१) आटपाडी तालुका - 1
२) जत तालुका - 16
३) कवठेमहांकाळ तालुका - 3
४) मिरज तालुका - 34
५) पलुस तालुका - 20
६) वाळवा तालुका - 11
७) तासगांव तालुका - 12
८) शिराळा तालुका - 2
९) कडेगाव तालुका - 4
१० ) खानापूर तालुका - 4
गुरुवारी मृत्यू झालेले रुग्ण सांगलीच्या नळभाग आणि कृष्णाघाट येथील आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या 81 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. उपचार सुरू असलेले 78 जण हे अतिदक्षता विभागात आहेत. यापैकी 55 जण हे ऑक्सिजनवर तर 21 जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर आणि इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर 2 जण उपचार घेत आहेत.
सांगलीत तब्बल 241 नवे कोरोना रुग्ण; पालिका क्षेत्रातील 134 बाधितांचा समावेश - corona update sangli
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 241 रुग्ण आढळले असून दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.