सांगली - इस्लामपूर शहरातील हॉस्पिटल व कोविड सेंटरमधील रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ झाली असून त्याबाबत बिलांचे व उपचाराचे ऑडिट होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रशासनाला सूचना देण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. तसेच ९० टक्क्याहून अधिक हॉस्पिटल, डॉक्टर्स झोकून देवून काम करीत आहेत. परंतु काही हॉस्पिटलमध्ये तक्रारी असून त्यांचे ऑडिट करण्यात येईल, असेही ते म्हणाले. तहसील कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
रुग्ण डिस्चार्ज होण्या अगोदर बिलांची तपासणी व्हावी -
मर्यादेपेक्षा जादा बिलांची आकारणी केल्याबाबत एक दोन हॉस्पिटलच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांचे ऑडिट होणे आवश्यक आहे. रुग्ण डिस्चार्ज होण्या अगोदर बिलांची तपासणी व्हावी, अशी मागणी फोन व मेसेजद्वारे झाली आहे. त्यावर लक्ष ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. कोणत्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण उपचारात किती, कोरोनामुक्त किती व मृत्यू किती याबाबत प्रशासनाला माहिती मिळणे गरजेचे आहे.
हेही वाचा - ५० लाख लस खरेदी करणार, मोफत लसीसाठी गळा काढणाऱ्यांनी सेंटरवर जावं- मुंबई महापौर