ETV Bharat / state

लॉक डाऊनचा असाही इफेक्ट! तळीरामांनी दारूसाठी चक्क दारूची दुकाने फोडली - State Excise Department sangli

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही दुकान खुले नसल्याने नागरिकांना बाकी कोणत्याही वस्तु मिळत नाही. अगदी दारूसुद्धा!

liquor store breaks down in Sangli
सांगलीत तळीरामांनी दारूसाठी चक्क दारूची दुकाने फोडली
author img

By

Published : Mar 26, 2020, 11:41 PM IST

सांगली - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता, उतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, यामुळे तळीरामांची मोठी गोची झाली आहे. अशाच काही दारूसाठी व्याकुळ झालेल्या तळीरामांनी सांगली आणि मिरजेत थेट बंद असलेली दारूची 2 दुकाने फोडली आहे आणि दारूच्या बाटल्या लंपास केल्या आहे.

सांगलीत तळीरामांनी दारूसाठी चक्क दारूची दुकाने फोडली...

हेही वाचा... Coronavirus : नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरू - उद्धव ठाकरे

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही दुकान खुले नसल्याने नागरिकांना वस्तु मिळत नाही. अगदी दारू सुद्धा! राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगली जिल्ह्यातील सर्व दारू दुकानांना सील ठोकून ते बंद केली आहेत. त्यामुळे कोठेही दारू उपलब्ध होत नाही. मद्यपींची मात्र या कारवाईने मोठी गोची झाली आहे.

दारूने व्याकूळ झालेले अनेक तळीराम दारू मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातुनच सांगली आणि मिरजेत तळीरामांनी थेट दारूची दोन दुकाने फोडली. तसेच या दुकानामधून दारूच्या अनेक बाटल्या चोरल्या आहेत. याबाबत दारू दुकानदारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या दोन्ही दुकानांना कुलप लावण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.