ETV Bharat / state

तुम्ही नारळ फोडत राहा, उमेदवारी मला मिळो, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांमध्ये मिश्कील टोलेबाजी - सांगली विधानसभा मतदारसंघ

सांगली विधानसभेच्या उमेदवारीचा काँग्रेसमधील सुप्त संघर्ष आज एका उद्घाटनाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. तर राष्ट्रवादीनेही यामध्ये उडी घेत यंदा आपली दावेदारी असणार असल्याचे मिश्कीलपणे जाहीर केले. सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून सुप्त संघर्ष आज मिश्कीलरित्या समोर आला आहे. हा संघर्ष भविष्यात टोकाचा बनल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित..

Sangli Assembly candidature
Sangli Assembly candidature
author img

By

Published : Aug 15, 2021, 6:58 PM IST

Updated : Aug 15, 2021, 7:19 PM IST

सांगली - सांगली विधानसभेच्या उमेदवारीचा काँग्रेसमधील सुप्त संघर्ष आज एका उद्घाटनाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. तर राष्ट्रवादीनेही यामध्ये उडी घेत यंदा आपली दावेदारी असणार असल्याचे मिश्कीलपणे जाहीर केले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बजाज यांच्यात ही उमेदवारीची मिश्कील चर्चा रंगली. मात्र ही मिश्कील टोलेबाजी भविष्यातील संघर्षाची ठिणगी असल्याची नांदी आहे.

उमेदवारीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत टोलेबाजी -

विधानसभेची निवडणूक अजून खूप लांब आहे, मात्र सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधला सुप्त संघर्ष समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे, तर राष्ट्रवादीही विधानसभेच्या जागेवरून आक्रमक असणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. सांगलीमधील 15 ऑगस्ट निमित्ताने आयोजित महापालिकेच्या विकासाच्या शुभारंभ प्रसंगी हा सर्व प्रकार समोर आला आहे. नेमिनाथ नगर या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या बाल उद्यानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यात ही खुमासदार जुगलबंदी रंगली.

विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांमध्ये मिश्कील टोलेबाजी
तुम्ही नारळ फोडा उमेदवारी मला मिळो -
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नारळ फोडण्यासाठी विशाल पाटील यांना आग्रह केला, मात्र विशाल पाटलांनी पृथ्वीराज पाटील पहिल्यांदा नारळ फोडतील असं स्पष्ट केल्याने जयंत पाटलांनी पृथ्वीराज पाटील यांना नारळ फोडण्यासाठी सांगितले. यावेळी पृथ्वीराज पाटील नारळ फोडण्यासाठी पुढे येताच विशाल पाटलांनी सगळे नारळ फोडण्याचे काम पृथ्वीराज बाबांनी करायचे आणि ऐनवेळी उमेदवारी व तिकीट आपणाला मिळो, अशी मिश्कील इच्छा व्यक्त करताच.. एकच हास्यकल्लोळ सुरू झाला. मात्र पृथ्वीराज बाबांनी यावर हजरजबाबीने ती मिळो पण लोकसभेची मिळो, अशा शब्दात शुभेच्छा दिल्याने पुन्हा हस्यकल्लोळ झाला. काँग्रेस नेत्यांची ही मिश्कील जुगलबंदी संपते, तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सांगलीच्या जागेवर दावा असणार असल्याचे स्पष्ट करताच पुन्हा एकदा हास्यकल्लोळ झाला.
उमेदवारीवरून संघर्षाची नांदी -
गत विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस कडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली होती,असे जरी असल्या तरी गेल्या काही वर्षांपासून विशाल पाटील हे सांगली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक राहिले होते, मात्र त्याआधी विशाल पाटील यांना त्यावेळी राजकीय उलथा-पालथीमुळे सांगली लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. त्यांना विधानसभा निवडणुकीपासून लांब रहावे लागले होते. मात्र त्यांच्या मनात विधानसभा उमेदवारीची इच्छा कायम असल्याचे दिसून आले आहे. तर दुसर्‍या बाजूला पृथ्वीराज पाटील यांनी, मात्र पुन्हा आपणचं दावेदार असल्याचे स्पष्ट केले आहे..आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये उदघाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून सुप्त संघर्ष आज मिश्कीलरित्या समोर आला आहे. हा संघर्ष भविष्यात टोकाचा बनल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित..

Last Updated : Aug 15, 2021, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.