सांगली - शिवसेना कोणाची यावरुन उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यावर आज ( 3 जुलै ) सुनावणी होऊ शकली नाही. गुरुवारी ( 4 जुलै ) पुन्हा त्याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यावरती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायदेवतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या घटनेप्रमाणे न्याय देणे अपेक्षित आहे. मात्र, तसं होताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त करत देशात पक्षपातीपणा आणि एकपक्ष हुकूमशाही सुरू असल्याची टीका चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केली ( Prithiviraj Chavan on Supreme Court ) आहे.
'गुंतागुंतीचा मामला' - पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात काहीतरी निकाल होईल हे अपेक्षित होतं. पण, ते पुढे ढकलले. आता फार लांबलचक आणि गुंतागुंतीचा हा सगळा मामला आहे. आम्हाला आश्चर्य वाटतंय सर्वोच्च न्यायालयाच्या व्हेकेशन बेंचच्या दोन न्यायाधीशांनी जो निर्णय दिला, तो आश्चर्यकारक होता. खरंतर आमदारांच्या निलंबनाची कारवाई प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांची शपथ देणे हे चुकीच होते. त्यानंतर अध्यक्षांची निवड ही देखील होऊन गेलेली आहे.
'आता घड्याळ सर्वोच्च न्यायालय उलटे फिरवणार आहे का?' - सर्वोच्चन न्यायालयात काय चाललयं हे आता वाटत आहे. पण, आमची आणि संपूर्ण देशातल्या जनतेची अपेक्षा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अभ्रिप्रेत न्यायदेवतेने न्याय दिला पाहिजेत. पण, ते होताना दिसत नाही. गुरुवारी त्या ठिकाणी मोठं बेंच बसेल आणि ते कायद्याप्रमाणे न्याय देईल, यातून राज्यातली परिस्थिती स्थिर-स्थावर होईल. यापुढे असा घोडे बाजार चालणार नाही, असे मत देखील आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
'विरोधकांना संपवण्याचे काम सुरू' - देशामध्ये ईडीकडून ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे, ते पाहता पक्षपातीपणा सुरू असल्याचे दिसते. कारण ईडीकडून कारवाई होते, पण ते नेते भाजपात गेल्यावर तांदळासारखे होतात. हे सर्व एक पक्षीय हुकूमशाही सुरू आहे. विरोधकांचे आवाज आणि विरोधकांना संपवण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
हेही वाचा - Uday Samant : 'सहनशीलतेचा अंत पाहू नका...', उदय सामंतांचा शिवसैनिकांना धमकीवजा इशारा