ETV Bharat / state

घरगुती गॅस सिलिंडरचे दर पुन्हा भडकले; चूलच बरी म्हणण्याची आली वेळ - घरगुती गॅस सिलिंडर लेटेस्ट न्यूज

घराघरात व अगदी झोपडीत सुद्धा गॅस असावा, म्हणून मोदी सरकारने प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना आणून सर्वसामान्य महिलांनच्या डोळ्यातील धुराचे अश्रू पुसले होते. मात्र, एप्रिल महिन्यापासून सर्व गॅस अनुदान बंद करून सध्याच्या दरवाढीने पुन्हा महिलांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. यामुळे 'आपली चूलच भारी' म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडर दरवाढ न्यूज
घरगुती गॅस सिलिंडर दरवाढ न्यूज
author img

By

Published : Dec 16, 2020, 7:41 PM IST

वाळवा (सांगली) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कित्येक लोक कमी पगारात आपले घर चालवत आहेत. तर, काही बेरोजगारही झाले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांचे बजेट पुन्हा कोलमडणारी बातमी समोर आली आहे. ऑईल कंपन्यांनी एलपीजी गॅस अर्थात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

इतकी झाली वाढ

दरम्यान, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये ५० रुपये प्रतिसिलिंडर वाढ झाली आहे. तर, ५ किलोग्रॅम छोट्या सिलिंडरच्या किमतीत १८ रुपयांनी वाढ केली आहे. गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये १५ दिवसांमध्ये ही दुसरी वाढ आहे. याशिवाय, १९ किलोग्रॅमच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या भावात ३६.५० रुपयांची वाढ झाली असून नवीन किंमत १ हजार ९५० रुपये इतकी झाली आहे. तर, नव्या किमती मंगळवारपासून (ता. 15) लागू झाल्या आहेत.

यापूर्वी, तेल कंपन्यांनी ३ डिसेंबरला गॅस सिलिंडरच्या भावात ५० रुपयांची वाढ केली होती. विनासबसिडीवाल्या घरगुती सिलिंडरची किंमत आता 710 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ही किंमत ६७०.५० रुपये, मुंबईत ६४४ रुपये आणि चेन्नईमध्ये ६६० रुपये झाली आहे.

हेही वाचा - लॉकडाऊनचा परिणाम; घरकाम करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ..

दर महिन्याला ठरतात सिलिंडरचे दर

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरचे दर ठरवतात. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्याने त्यानुसार गॅस सिलिंडरच्या दरात फरक असतो. नेहमी प्रमाणे १ डिसेंबरलाही गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला होता. यानुसार, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर व व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता घरगुती गॅस साठी ७१० रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

घराघरात व अगदी झोपडीत सुद्धा गॅस असावा, म्हणून मोदी सरकारने प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना आणून सर्वसामान्य महिलांनच्या डोळ्यातील धुराचे अश्रू पुसले होते. मात्र, एप्रिल महिन्यापासून सर्व गॅस अनुदान बंद करून सध्याच्या दरवाढीने पुन्हा महिलांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. यामुळे 'आपली चूलच भारी' म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आली आहे.

हेही वाचा - नाशिक: 90 टक्के दुचाकीचालकांचा विनाहेल्मेट प्रवास, प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.