सांगली - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका ( Chandrasekhar Bawankule critics on Uddhav Thackeray ) केली आहे. भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर केवळ चार माणसे दिसतील अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे - भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर केवळ चार माणसांशिवाय कोणीच दिसणार नाही,अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.काँग्रेस राष्ट्रवादी विचारधारेला घेऊन या पद्धतीने पक्ष चालवतायेत,त्यामुळे ही परिस्थिती येणार आहे,असं मत देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतींचा शिंदे गटात प्रवेश - शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त असणारे पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशावरून बावनकुळे यांनी हा निशाणा साधला आहे.