सांगली - मिरजेच्या एका सराफा व्यवसायिकाला अडीच कोटीच्या कर्जाच्या बदल्यात तब्बल आठ कोटींच्या व्याजाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच पैश्याच्या वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने सहा खासगी सावकारांच्या विरोधात मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौघा सावकारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
6 सावकारांच्या विरोधात गुन्हे दाखल - मिरज शहरातील सोने-चांदीच्या व्यापारी असणाऱ्या राहिल शेख या सराफाचे अपहरण करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. शेख यांनी घेतलेल्या कर्जातुन हा प्रकार झाला आहे. या प्रकरणी शेख यांनी मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात 6 सावकारांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.मिरज शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक रफिक पटेल आणि अभिजित ताशीलदार,
जऊर रफिक पटेल,अजमल पटेल,मन्सूर मुल्ला,आणि दिवाकर पोतदार यांच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी सह बेकायदेशीर सावकारीची गुन्हा दाखल झाला आहे.
अडीच कोटींच्या बदल्यात 8 कोटींची मागणी - सराफ व्यावसायिक शेख यांनी बांधकाम व्यावसायिक रफिक पटेल यांच्या अपार्टमेंटमधील फ्लॅट खरेदी केला होता. त्यानंतर त्यांची पटेल यांच्याशी ओळख वाढली होती. ज्यातून शेख यांनी पटेल यांच्याकडून व्यवसायासाठी 2019 पूर्वी 2 कोटी 83 लाख 75 हजार रुपये कर्ज घेतले होते. 10 टक्क्यांनी पटेल यांनी आपल्या साथीदारांच्या माध्यमातून शेख यांना कर्ज दिले होते. मात्र, कर्ज फेडून देखील आणखी आठ कोटींच्या मागणीसाठी पटेल आणि त्यांच्या सावकार साथीदारांच्याकडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत शेख यांनी तक्रार दाखल केली. तसेच पैश्याच्या वसूलीसाठी आपला मिरज शहरातील किल्ला भाग येथील फ्लॅट देखील बळकावला असल्याचे शेख यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे.
छापा टाकत,चौघे सावकार ताब्यात - राहिल शेख यांच्या फिर्यादीनंतर महात्मा गांधी चौकी पोलिसांनी पटेल यांच्यासह 6 जणांच्यावर गुन्हे दाखल करत बांधकाम व्यावसायिक पटेल यांच्या घरावर छापा टाकत घरातून काही संशयास्पद कागदपत्रे आणि बँका खात्यांची कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच या प्रकरणी चौकशीसाठी रफिक पटेल यांच्यासह चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणवीस यांनी दिली आहे.
अडीच कोटींच्या बदल्यात आठ कोटीची मागणी करणाऱ्या 6 सावकारांवर गुन्हा दाखल
सराफ व्यावसायिक शेख यांनी बांधकाम व्यावसायिक रफिक पटेल यांच्या अपार्टमेंटमधील फ्लॅट खरेदी केला होता. त्यानंतर त्यांची पटेल यांच्याशी ओळख वाढली होती. ज्यातून शेख यांनी पटेल यांच्याकडून व्यवसायासाठी 2019 पूर्वी 2 कोटी 83 लाख 75 हजार रुपये कर्ज घेतले होते. 10 टक्क्यांनी पटेल यांनी आपल्या साथीदारांच्या माध्यमातून शेख यांना कर्ज दिले होते. मात्र, कर्ज फेडून देखील आणखी आठ कोटींच्या मागणीसाठी पटेल आणि त्यांच्या सावकार साथीदारांच्याकडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत शेख यांनी तक्रार दाखल केली.