सांगली - भरधाव दुचाकी आणि चारचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रकाश जाधव (वय - 40, रा. बेडग, ता. मिरज) असे मृताचे नाव आहे. हा अपघात शहरातील यशवंत नगर याठिकाणी घडला. दरम्यान, अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
दुचाकीस्वार 15 फूट लांब हवेतून उडाला..
दुचाकीवरून जाधव हे यशवंतनगर मार्गे माधवनगर कडे निघाले होते. त्यावेळी जात असताना समोरून एका दुचाकीला ओव्हरटेक करून येणाऱ्या दुचाकीवर जाऊन जोरात धडकली. ही धडक इतकी जोरात होती की, जाधव हे मारुती कारवरून हवेतून गाडीच्या मागे रस्त्याच्या कडेला 15 फूट लांब जाऊन पडले. यात त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
हेही वाचा - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो वैद्य यांचे नागपुरात निधन
अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद -
हा अपघात ज्या ठिकाणी घडला तिथे समोर काही अंतरावर घरासमोर लावण्यात आलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये अपघाताचे दृश्य कैद झाली आहेत. यात जाधव यांची दुचाकी आणि समोरून आलेल्या दुचाकीची कशी धडक झाली, हा प्रकार चित्रित झाला आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.