ETV Bharat / state

Bus Service Return to Normalcy : सांगलीची बस सेवा पूर्वपदावर ! 238 बसेस लागल्या धावू, 19 दिवसात 15 कोटींचे नुकसान - एसटी पुन्हा धावली

सांगली जिल्ह्यातील 4 हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी दोन हजार एसटी कर्मचारी आता पुन्हा कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे जिल्हा अंतर्गत याशिवाय जिल्ह्याबाहेरची बस सेवा सुरू ( Bus Service Return to Normalcy ) झाली आहे. 238 बसेस आता धावू लागलेल्या आहेत.

Bus Service Return to Normalcy
सांगलीची बस सेवा पूर्वपदावर
author img

By

Published : Nov 27, 2021, 2:58 PM IST

Updated : Nov 27, 2021, 3:13 PM IST

सांगली - सांगली एसटी आगारातून ( Sangli ST Depot ) आता हळू-हळू एसटी सेवा पूर्वपदावर ( ST bus service resumed in Sangli ) येऊ लागलेली आहे. दोन हजार कर्मचारी सेवेत पुन्हा परतले आहेत. त्यामुळे हा 238 बसेस सुरू झाले आहेत.मात्र गेल्या 19 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सांगली एसटी आगाराचे 15 कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

4 हजार पैकी 2 हजार कर्मचारी हजर -

सरकारी एसटी दिलेली कलम मागणी घेऊन राज्यातले एसटी कर्मचारी संपात उतरले होते. गेल्या 19 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सर्व कर्मचारी संपात उतरल्याने जिल्ह्यातील एसटी सेवा ठप्प झाली होती. मात्र आता बहुतांश मागण्या मान्य झाल्याने व कारवाईच्या पार्श्वभूमीवर हळूहळू एसटी कर्मचारी सेवेत हजर होऊ लागले आहेत. सांगली जिल्ह्यातील 4 हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी दोन हजार एसटी कर्मचारी आता पुन्हा कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे जिल्हा अंतर्गत याशिवाय जिल्ह्याबाहेरची बस सेवा सुरू झाली आहे. 238 बसेस आता धावू लागलेल्या आहेत.

19 दिवसात 15 कोटींचे नुकसान -

एकोणीस दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सांगली एसटी आगाराचे जवळपास पंधरा कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तर सेवेत हजर न झालेल्या 254 कंत्राटी कामगारांपैकी 78 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कारवाई झाली आहे. तर 284 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती
सांगली आगार विभागीय नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा - Vaccination at Petrol Pumps : पहिल्यांदाच 'अशा' पद्धतीने लसीकरण, औरंगाबादकरांचा मिळतोय चांगला प्रतिसाद!

Last Updated : Nov 27, 2021, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.